ई श्रमिक कार्ड नोंदणी शिबिराला परिसरातील असंघटित कामगारांचा भरघोस प्रतिसाद ; शंभराच्या वर असंघटित कामगारांनी केली नोंदणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 19 January 2022

ई श्रमिक कार्ड नोंदणी शिबिराला परिसरातील असंघटित कामगारांचा भरघोस प्रतिसाद ; शंभराच्या वर असंघटित कामगारांनी केली नोंदणी


यवतमाळ  :  19 जानेवारी 2022 रोजी प्रभाग क्रमांक 8 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक पाटीपुरा यवतमाळ येथे श्रमिक कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन ॲड राहुल पाटील आणि मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आले होते.

              ई-श्रमिक कार्ड नोंदणी शिबिराला परिसरातील असंघटित कामगारांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन आपली नोंद श्रमिक कार्ड नोंदणी पोर्टल वर करून घेतली, दुपारी 12 ते 5 या दरम्यान शिबिराचे आयोजन केले होते परंतु नागरिकांच्या प्रतिसादामुळे सायंकाळी 7.30 वाजता पर्यंत हे शिबीर चालू ठेवण्यात आले होते. आणि या दरम्यान परिसरातील शंभरच्यावर असंघटित कामगारांनी आपली नोंद या शिबिराच्या माध्यमातून केली. भविष्यात नोंद केलेल्या असंघटित कामगारांना योजनांचा लाभ मिळू शकतो, दोन लाख रुपयांपर्यंतचा अपघाती विमा, दवाखान्यातील सुविधा तसेच अन्य लाभ  असंघटित कामगारांना मिळणार आहेत.

               तत्पूर्वी बहुजन समाज पार्टीच्या ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून ई श्रमिक कार्ड नोंदणी शिबिराला सुरुवात करण्यात आली.

                या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तेजस चव्हाण, राकेश कोवे, शुभम राऊत, देवीचंद पवार, भूषण कुत्तरमारे, प्रशांत पाझारे, सचिन मुंगले, सुनिल डोंगरे यांनी सहकार्य केले.

                   

No comments:

Post a Comment

Pages