अंनिस व बिलोली पोलिसांनी केला तौफिक बाबाचा भांडाफोड : जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 7 February 2022

अंनिस व बिलोली पोलिसांनी केला तौफिक बाबाचा भांडाफोड : जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल

बिलोली : तालुक्यातील कासराळी येथील दस्तगीर दर्ग्यावरील  तौफिकबाबाकडे दैनंदिन स्वरूपाच्या समस्या किंवा आजारावरील उपचारासाठी स्थानिक व आजूबाजूचे लोक जातात.  त्यासाठी तो 251, 501, 1001₹ घेतो. समस्या घेऊन गेलेल्या लोकांना तुमची समस्या किंवा आजार जादुटोना किंवा करणीमुळे निर्माण झाली आहे असे सांगत असल्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. पाच पन्नास लोक गोळा करून अंगात दैवी शक्ती असल्याचा भास तो निर्माण करतो. 


दिनांक 28/1/2022 रोजी ईरन्ना बोरोड याचा पाय दुखत असल्यामुळे उपचारासाठी तो तौफिकबाबाकडे गेला. त्याला आपल्या पायाच्या त्रासा बद्दल सांगितले. तौफिक  बाबांने अंगात आल्याचे भासवून "तुमचा त्रास दवाखान्यातल्या नसून रूक्‍मीनबाई बोरोड यांनी तुमच्यावर मंत्राने करणी, जादूटोणा केल्यामुळे तुम्हाला हा त्रास होत असल्याचे सांगितले. नाव सांगितल्यामुळे रूक्‍मीनबाई कडे लोक संशयाने बघायला लागले. त्यांच्याशी वादावादी-भांडण करू लागले. याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समिती नांदेडकडे तक्रार दिली. 


अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारणी सदस्य सम्राट हटकर, जिल्हा प्रधान सचिव कमलाकर जमदाडे,

यांनी शिवाजी डोईफोडे पोलीस निरीक्षक बिलोली यांची भेट घेऊन तपशीलवार चर्चा केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्टिंग ऑपरेशनची योजना बनवली. त्या योजनेनुसार दि. 4 फेब्रुवारी 2022 रोजी सापळा रचून तोफिक बाबाचा भांडाफोड केला आणि जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. 


या भांडाफोड प्रकरणांमध्ये पोलीस उपनिरीक्षक सय्यद एम. झेड, पोलीस उपनिरीक्षक रूपाली कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल शिंदे जी. बी. ,भारत फंताडे, कोरनोळे  बी. एस. आधी पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. तसेच या मोहिमेत अंनिसचे बिलोली चे कार्याध्यक्ष फारुक शेख, बालाजी एलगंद्रे, मोहन जाधव, सायलू कारमोड यांची मदत झाली.

No comments:

Post a Comment

Pages