आमदार भीमराव केराम यांनी निवासस्थानावरून दिल्या शिवभक्तांना शुभेच्छा! - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 19 February 2022

आमदार भीमराव केराम यांनी निवासस्थानावरून दिल्या शिवभक्तांना शुभेच्छा!

किनवट,प्रतिनिधी: 

आज रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती!धर्म आणि स्वराज्य याची धगधगती मशाल ज्यांनी पेटवली ते छत्रपती शिवाजी महाराज! राज्यात या 'जाणत्या राजाची जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आमदार भीमराव केराम यांनी त्यांच्या निवासस्थानी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन,अभिवादन करून महाराजांचा आशीर्वाद घेतल्यानंतर संपूर्ण शिवभक्तांना शिव जयंतीच्या शुभेच्छा त्यांच्या निवासस्थानाहून दिल्या. त्यानंतर आमदारांच्या जनसंपर्क कार्यालयात देखील महाराजांची जयंती उत्सव मोठ्या आदराने साजरा करण्यात आला. यावेळी आमदारांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांसह पक्षपदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 


परकीय आक्रमण आपण केवळ एकजूट असू तर परतवून लावू शकू हे त्यांनी त्यांच्या कृतीतून सिद्ध केले जे आजही लागू होते.हिंदू, मुस्लिम, किंवा इतर कोणत्याही धर्माला त्यांच्या स्वराज्यात मानाचे स्थान होते. प्रत्येक धर्माचा आदर आणि सन्मान करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे अत्यंत प्रगल्भ राजे आणि मुत्सद्दी राज्यकर्ते होते. महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र आजच्या दिनाला दीपावली या प्रमाणे मोठ्या संख्येने साजरा केला जात असतानाच आमदार भीमराव केराम यांनी तुमच्या निवासस्थानावर जयंती साजरी करून शिवभक्तांना शुभेच्छा दिल्या तर त्यांच्या लोकार्पण व जनसंपर्क कार्यालयात कर्मचाऱ्यांना मोठ्या उत्साहाने महाराजांची जयंती साजरी केली.यावेळी आमदार भीमराव केराम यांचे स्वीय सहायक प्रकाश कुडमते,प्रतीक केराम,संदेश केराम,मारुती भरकड, उत्तम जाधव,संतोष मरस्कोल्हे,श्रीनिवास नेमानीवार,उमाकांत पाटील कराळे,बालाजी पावडे, शेखर चिंचोळकर,नंदू कराळे,शेख रफीक,शेख इब्राहिम,सुभाष कोहाळ,सत्कार महामुने,सुरेश साकपेलीवारा,दत्ता भिसे,बबलू जाधव गजानन मासटवार,रामेश्वर गिनगुले व सुरेखा घाटकर यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages