नांदेड :
आंबेडकरवादी मिशन अभ्यास केंद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणुन त्यांच्या भाषणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
19 फेब्रुवारी 2004 रोजी ASRC माध्यमातून आपण सार्वजनिक कार्याला सुरुवात केली असल्याचे स्पष्ट करून, आज आंबेडकरवादी मिशन देशपातळीवर राष्ट्रनिर्मितीसाठी प्रशासक निर्मितीचे एक महत्त्वाचे केंद्र ठरले आहे. आंबेडकरवादी मिशन ची विद्यार्थी देशात सध्या 22 राज्यात विविध प्रशासकीय पदावर कार्यरत असल्याचे याप्रसंगी स्पष्ट करून आगामी काळात याच प्रशासकाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाची चळवळ पुढे आणण्याचा प्रयत्न आंबेडकरवादी मिशन करेल यासाठी विद्यार्थ्यांनी मावळ्यांची भूमिका बजावावी असे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने विद्यार्थ्याकडून दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन यांनी अपेक्षा व्यक्त केली. आंबेडकरवादी मिशन मधील विद्यार्थी हाच माझ्यासाठी मावळा आहे जो परिवर्तनाचा लढा लढेल असा ठाम विश्वास दीपक कदम यांनी व्यक्त केला...
याप्रसंगी मधील विद्यार्थी शेषराव वाघमारे अलका गायकवाड, नंदा वाघमारे, भीमराव वाघमारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment