एम. फिल.च्या संशोधक विद्यार्थ्यांना पी. एच. डी. पर्यंत सलग फेलोशिप द्या ; बार्टी कार्यालया समोर विद्यार्थ्यांचे उपोषण सुरू - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 8 March 2022

एम. फिल.च्या संशोधक विद्यार्थ्यांना पी. एच. डी. पर्यंत सलग फेलोशिप द्या ; बार्टी कार्यालया समोर विद्यार्थ्यांचे उपोषण सुरू

पुणे : बार्टी द्वारे देण्यात येणारी फेलोशिप एम फील च्या पात्र विद्यार्थ्यांना पी एच डी पर्यंत सलग देण्यात यावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी  पुण्यातील बार्टी कार्यालयासमोर उपोषणस सुरुवात केली आहे.

   

 विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार एम फील करीता दोन वर्षे तर पी एच डी करीता तीन वर्षे अशी एकूण पाच वर्षे  अशी एकूण पाच वर्षे सलग फेलोशिल दिली जाते.तसेच स्वतंत्र पाच वर्षे पी एच डी करिता फेलोशिप दिली जाते.

मग सारथी व महाज्योती प्रमाणेच सरसकट विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात यावी आणि पी.एच.डी. पर्यंत सलग करावी.अस उपोषणकर्ते विद्यार्थ्यांनी सांगितले.

याच प्रश्नांसाठी  परळी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर  दहा दिवस साखळी उपोषण देखील या विद्यार्थ्यांनी केलं आहे.या सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी भेट दिली होती.त्यांनी एका महिन्यात हा प्रश्न सोडऊ असे लेखी आश्वासन देऊन उपोषण सोडवलं होत.

उपोषण सोडून दोन महिने उलटले तरीसुध्दा या विद्यार्थ्यांना बार्टी महासंचालक व सामाजिक न्याय मंत्र्यांनी प्रश्न मार्गी लावला नाही म्हणून संशोधन कार्य थांबवून पुन्हा बार्टी च्या कार्यालया समोर अक्षय जाधव , नारायण खरात, भीमराव वाघमारे, अमोल शिंदे,दिक्षा ढगे, श्रद्धा शिरसाट यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.



  

No comments:

Post a Comment

Pages