फुले- भीम महोत्सवाचे आजपासून आयोजन जेष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे प्रमुख वक्ते असतील - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 6 April 2022

फुले- भीम महोत्सवाचे आजपासून आयोजन जेष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे प्रमुख वक्ते असतील

औरंगाबाद:-  येथील औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या  वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त फुले-भीम महोत्सव आज पासून मोठ्या उत्साहात साजरा  करण्यात येत आहे, या महोत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे असणार आहेत, उदघाटक म्हणून विलास बापू औताडे असणार आहेत, तर प्रमुख उपस्थिती माजी मंत्री अनिल पटेल, व हिशाम उस्मानी असणार आहेत, फुले-भीम महोत्सवात विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे,महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन,मुख्य संयोजक-डॉ. अरूण  शिरसाट यांनी केले आहे,

या महोत्सवाचे मार्गदर्शक केशवराव अवताडे, प्रकाश दादा मुगदिया उत्तमसिंह पवार, कल्याण काळे,  माझी आमदार सुभाष झाम्बड,  इब्राहिम पठाण ,ऍड.इक्बालसिंग गिल,दिनकर ओंकार, सय्यद अक्रम, माजी पोलीस उपायुक्त दौलतराव मोरे सय्यद हमीद, किरण भाऊ पाटील ऍड.अंजलीताई वडजे व रेखा राऊत,डॉ. अनिल पांडे, पद्माकर कांबळे, विलास पांडे प्रा. प्रकाश वाघमारे. समिती प्रमुख किशोर सरोदे (उपाध्यक्ष) प्रसिद्धी प्रमुख-शिलवंत गोपणारायन

महोत्सव समन्वयक- डॉ.मिलिंद आठवले हे असून फुले-भीम महोत्सव सप्ताहात,संविधान जनजागृती या उपक्रमांतर्गत, संविधान वाटप,बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ मोफत वाटप व  मिलिंद प्रश्न मोफत वितरित,

 विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या व  उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव म्हणून पुरस्कार देऊन सन्मान,. व्याख्यानमाले अंतर्गत प्रसिध्द व नामवंत व्याख्यात्यांची वैचारिक व्याख्याने, काव्य वाचन स्पर्धा, 7 एप्रिल ते 12 एप्रिल 2022 दरम्यान मोठया संख्येने उपस्थित राहून, लाभ घ्यावा व सहभागी होऊन हा महोत्सव साजरा करण्यासाठी आपणांस आग्रहपूर्वक निमंत्रण, पहिल्यांदाच औरंगाबाद काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग, यांच्या वतीने फुले- भीम महोत्सव आयोजित करण्यात आला आहे,

दि.7 एप्रिल 2022  रोजी उदघाटन समारंभ वेळ-11:00 वाजता होणार असून,

उदघाटक- विलास बापू औटाडे

प्रमुख उपस्थिती- अनिल पटेल (माजी मंत्री)

प्रमुख वक्ते - डॉ.रावसाहेब कसबे (जेष्ठ आंबेडकरी विचारवंत तथा भाष्यकार)

स्थळ- गांधी भवन शहागंज, औरंगाबाद.

प्रमुख उपस्थिती- हिशाम उस्मानीजी 

प्रमुख उपस्थिती- इब्राहिम पठाण

असणार आहेत, 


दि.8 एप्रिल 2022

उदघाटक - उत्तमसिंग पवार

प्रमुख उपस्थिती - डॉ. अभिजित वाडेकर (प्राचार्य, पी.ई.एस इंजि. कॉलेज, औरंगाबाद)

मा.नामदेव पवार,  उपस्थित असणार आहेत.

प्रमुख वक्ते - मा.श्रीमंत कोकाटे असणार आहेत.


दि.9 एप्रिल 2022

कवी संमेलन व पुरस्कार वितरण समारंभ 


प्रमुख पहाणे- दौलतराव मोरे माजी पोलीस अधिकारी असणार आहेत, 


कवी, वक्ते- मा.देवानंद पवार हे आहेत.


दि.10 एप्रिल 2022

ग्रंथ वाटप व संगीत भीम रजनी कार्यक्रम, भावसिंगपूरा, औरंगाबाद येथे आयोजित केला आहे.


उदघाटक- मा.प्रकाश दादा मुगदिया  


आंबेडकरी सुप्रसिद्ध कवी, गायक, जलसाकार मा.प्रतापसिंग बोदडे आणि त्यांचे पट्टशिष्य कवी , गायक आणि समीक्षक प्रा.डॉ.किशोर वाघ यांच्या गाण्यांचा बहारदार कार्यक्रम.

वेळ- सायंकाळी 06  वाजता



दि.11 एप्रिल 2022

म.फुले जयंती


प्रमुख वक्ते- प्रा.सुदाम चिंचाने

प्रमुख उपस्थिती- मा.एम.एम.शेख असणार आहेत.

स्थळ-गांधी भवन, औरंगाबाद


समारोप 12 एप्रिल 2022 रोजी समारोप समारंभ तसेच विविध ग्रंथ वाटप ऊर्जामंत्री डॉ.नितीनजी राऊत साहेबांच्या हस्ते.

प्रमुख उपस्थिती- मा.ना.डॉ.नितीनजी राऊत साहेब, ऊर्जामंत्री महाराष्ट्र राज्य

स्थळ- गांधी भवन, शहागंज, औरंगाबाद.

वेळ-11:30 वाजता


कार्यक्रम संयोजक डॉ.अरुण शिरसाट, शहर जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी अनु.जा.विभाग हे आहेत,निमंत्रण समिती मध्ये- मा.किशोर सरोदे, मा.प्रा.शिलवंत गोपणारायन, डॉ.मिलिंद आठवले व मुजफ्फर अली हे असणार आहेत.

No comments:

Post a Comment

Pages