किनवट शहर व परिसरात डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात साजरी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 14 April 2022

किनवट शहर व परिसरात डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

किनवट,ता.१४ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज(ता.१४)शहर व परिसरातील उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीचा मुख्य सोहळा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संपन्न झाला.येथे मोठ्या संख्येने नागरिक अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते. भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांच्याहस्ते पंचरंगी ध्वजवंदन करण्यात आले.अनिल उमरे व महेंद्र नरवाडे यांनी सामुहिक वंदना घेतली.

     यावेळी आमदार भीमराव केराम,माजी आमदार प्रदीप नाईक,नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, फुले-आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विनोद भरणे,प्राचार्या शुभांगी ठमके,माजी नगराध्यक्ष के.मुर्ती,नगरसेवक श्रीनीवास नेम्मानीवार,एड.प्रतिक केराम,संतोष मरस्कोल्हे यांच्यासह आंबेडकर वादी नागरिक, विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व नागरिक मोठ्या संख्येने अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते.याठिकाणी सकाळी सहा वाजता वामनदादा कर्डक संगित अकादमीचे प्राचार्य सुरेश पाटील व संचाचा "भीम पहाट",हा बहारदार बुद्ध -भीम गितांचा कार्यक्रम झाला.सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले.जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर ही घेण्यात आले.  अ‍ॅड. सम्राट सर्पे व निखिल कावळे यांनी जयंतीनिमित्त एक वही एक पेन उपक्रम राबविला.या उपक्रमाला आंबेडकरी जनतेंनी चांगला प्रतिसाद दिला.

    बसस्थानकात व्यवस्थापक मिलिंद सोनाळे यांच्या हस्ते,तर सिद्धार्थ नगरातील जेतवन बुद्ध विहारात रिपाइंचे नेते दादाराव कयापाक यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.समता प्राथमिक विद्यालयात, काँग्रेस  पक्षाच्या कार्यालयात,आमदार भीमराव केराम यांच्या "लोकार्पण",जनसंपर्क कार्यालयात जयंतीनिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Pages