किनवट,दि.१५: भगवान बुद्ध, सम्राट अशोक, संत सेवालाल महाराज,छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त प्रबोधनात्मक बुद्ध-भीमगितांचा कार्यक्रम कोठारी(चि.ता.किनवट)येथे गुरुवारी(दि.१९)रात्री आठ वाजता आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रदिप नाईक हे राहणार आहे. भारतीय बौद्ध महा सभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके हे उद्घाटन करणार आहेत.या प्रसंगी किनवटच्या संथागार व्रध्दाश्रमाचे संचालक करुणा व अरुण आळणे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
याप्रसंगी विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते,लोकप्रतिनिधी, विविध आंबेडकरी पक्ष व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.सूत्रसंचालन एड.सचिन गिमेकर हे करणार आहेत.यावेळी प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्यासह भारतीय महीला शाहिर स्मिता पाटील व जॉली मोरे व संच (मुंबई)यांचा तुफानी शाहिरी जलसा होणार आहे.कार्यक्रमाचे आयोजक सांची बुद्ध विहार हे आहे,तर निमंत्रक गोकुंदा(ता. किनवट)चे माजी सरपंच प्रविण मँकलवार हे आहेत.
परिसरातील जनतेंनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने विजय पाटील,रमेश कांबळे,पपेश.कांबळे,सुनिल पाईकराव, प्रेमानंद कांबळे,सुधाकर हलवले,निखिल गिमेकर,संदेश हलवले,सुमित कांबळे,स्वप्निल भगत यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment