गोदावरीचे अर्बन चे कार्य को-ऑपरेटिव्ह सेक्टरसाठी अनुकरणीय आहे - सतीश मराठे; यांची गोदावरी अर्बनच्या नरिमन पॉईंट , मुंबई स्थित सेन्ट्रल ऑपरेशन् हब ला भेट - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 20 May 2022

गोदावरीचे अर्बन चे कार्य को-ऑपरेटिव्ह सेक्टरसाठी अनुकरणीय आहे - सतीश मराठे; यांची गोदावरी अर्बनच्या नरिमन पॉईंट , मुंबई स्थित सेन्ट्रल ऑपरेशन् हब ला भेट

नांदेड,  (बातमीदार) सहकार क्षेत्रात राहुन देखील राष्ट्रीयकृत बँकांसारखे कार्य करता येते. हे गोदावरी अर्बनच्या सेंट्रल हबच्या अत्याधूनिक सुविधांकडे बघुन लक्षात येते. दहा वर्षाच्या काळात गोदावरीने पाच राज्यात शाखा विस्तार करत यशाचा टप्पा गाठला आहे तो अद्वितीय असून, गोदावरीचे कार्य को-ऑपरेटिव्ही सेक्टरसाठी अनुकरणीय आहे असे मत  रिझर्व बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी व्यक्त केले. 

           नरिमन पॉईंट , गोदावरी अर्बनच्या कॉर्पोरेट कार्यालयाला सतीश मराठे यांनी गुरुवारी (ता.१९) भेट दिली. यावेळी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी त्यांचे स्वागत केले. ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, सोसायटीतिल् अधिकारी व कर्मचारी यांच्याकडुन ग्राहकांची घेतली जाणारी काळजी या बद्दल स्वतः पाहणी केली. सोबतच्  अत्याधुनिक सुविधांची देखील पाहणी करुन गोदावरी अर्बन सहकार क्षेत्रातील सर्वांसाठी रोल मॉडेल ठरेल असा विश्वास देखील श्री मराठे यांनी व्यक्त केला. यावेळी गोदावरी अर्बनचे अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संवाद साधला व भविष्यात गोदावरी अर्बन उत्तरोत्तर प्रगती करत राहो अशा गोदावरी परिवास शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Pages