किनवट, ता.२२ : जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, किनवट अंतर्गत सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात किनवट व माहूर तालुक्यात अनेक कामे करण्यात आली आहेत.यामध्ये पाणी टंचाईची कामे,जलजीवन मिशन योजने अंतर्गतची कामे,मगांरोहयो ची विविध विकास कामे,१५ व्या वित्त आयोगाची कामे,पेसा योजने अंतर्गत ची विकास कामे आदी कामांचा समावेश आहे.ही कामे करतांना संबंधितांनी प्रभारी उप अभियंता यांच्याशी संगनमत करुन मोठा भ्रष्टाचार करून वाहत्या गंगेत आपले हात धुवून घेतले आहे. या कामांची सक्षम अधिका-या मार्फत चौकशी करून संबंधितावर कडक कारवाई करण्यात यावी,अन्यथा आमच्या संघटनेला लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करावे लागेल,असा इशारा एका निवेदनाद्वारे "सेक्युलर मुव्हमेंट", या संघटनेच्या वतीने नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नुकताच देण्यात आला आहे.
निवेदनावर 'सेक्युलर मुव्हमेंट,'या संघटनेचे जिल्हाध्यक्ष अँड.मिलिंद सर्पे यांची स्वाक्षरी आहे.
निवेदनाच्या प्रती,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामीण विकास मंत्री, सहाय्यक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी यांना माहीतीस्तव व योग्य त्या कारवाईस्तव पाठविण्यात आल्या आहेत.
No comments:
Post a Comment