सफेदपूल येथे भव्य बुद्ध विहार उभरण्याची दिवंगत बापू प्रधान यांचे स्वप्न पूर्ण करणार - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 12 June 2022

सफेदपूल येथे भव्य बुद्ध विहार उभरण्याची दिवंगत बापू प्रधान यांचे स्वप्न पूर्ण करणार - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि. 12  : झोपडीवासीयांच्या हक्कासाठी अन्याया विरुध्द लढणारा संघर्षशिल कार्यकर्ता बापू प्रधान हे रिपब्लिकन चळवळीचे कुर्ला विभागाचे प्रधान होते. ज्येष्ठ आणि एकनिष्ठ प्रमुख कार्यकर्ते होते. त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून कुर्ला विभागात भरिव सामाजिक योगदान दिले आहे. त्यांच्या स्मृती जोपाण्यासाठी कुर्ला सफेदपुल या भागात दिवंगत बापू भिमा प्रधान यांचे उचित स्मारक उभारणार तसेच सफेदपूल येथे भव्य बुद्ध विहार उभरण्याची दिवंगत बापू प्रधान यांची ईच्छा आम्ही पूर्ण करू  असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले. 

यावेळी रिपब्लिकन पक्षातर्फे दिवंगत बापू प्रधान यांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांची सांत्वनपर मदत करणार असल्याचे ना.रामदास आठवले यांनी यावेळी जाहीर केले. 


सफेदपूल साकिनाका येथील गोल्डन नेक्सट हॉल येथे दिवंगत बापू प्रधान यांची जाहिर श्रध्दांजली सभा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजीत करण्यात आली होती.


यावेळी रिपाइं चे मुंबई प्रदेशअध्यक्ष गौतम सोनावणे;  महाराष्ट्र उपाध्यक्ष सहदेव (साधु) कटके, युवक आघाडी राज्य सरचिटणीस डॉ.विजय मोरे;विवेक पवार, बाबूशा कांबळे; पत्रकार अनिल गलगली ;  रतन आस्वारे, किसन रोकडे, सोना कांबळे, दादू भोसले; जयंतीभाई गडा, योगीराज भोसले, पवईचे बाळ गरुड, तसेच बापू प्रधान यांचे कुटुंबिय मथुराआई  भिमा प्रधान, मिनाताई बापू प्रथान, गोपळ बापू प्रधान, अतूल बापू प्रधान, गायत्रि, ज्योती, शोभा, सोनाली या अश्या चार विवाहीत मुली उपस्थित होत्या.तसेच रिपाइं चे अनेक मान्यवर पदाधिकारी  उपस्थित होते.


           

No comments:

Post a Comment

Pages