ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांची राष्ट्रीय ग्रीड कार्यवाह संस्थेला भेट राज्यात अखंडित व गुणात्मक वीज पुरवठा करण्याविषयी चर्चा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 18 June 2022

ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांची राष्ट्रीय ग्रीड कार्यवाह संस्थेला भेट राज्यात अखंडित व गुणात्मक वीज पुरवठा करण्याविषयी चर्चा

नवी दिल्ली, दि. 18 : राज्यात अखंडित व गुणात्मक वीज पुरवठा करण्याच्यादृष्टीने माहिती जाणून घेण्यासाठी  ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी  केंद्रशासनाच्या राष्ट्रीय ग्रीड कार्यवाह संस्थेला भेट दिली.


         श्री. वाघमारे यांनी केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या राष्ट्रीय ग्रीड कार्यवाह संस्थेच्या(पॉवर सिस्टिम ऑपरेशन कॉर्पोरेशन-पोसोको) कार्यालयाला नुकतीच भेट देवून या संस्थेद्वारे देशातील वीज क्षेत्रावर (निर्मिती,पारेषण आणि वितरणावर) होणारी देखरेख व त्याद्वारे देशभर होणाऱ्या अखंडित व गुणात्मक वीज पुरवठयाबाबतही माहिती जाणून घेतली. पोसोकोचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एस.आर. नरसिम्हन, राष्ट्रीय लोड डिस्पॅच सेंटरचे (एनएलडीसी) महाव्यवस्थापक विवेक पांडे, महाराष्ट्र राज्य वीज महामंडळाच्या पारेषण कंपनीचे सल्लागार श्री. प्रसाद ,

 होल्डींग कंपनीचे निवासी कार्यकारी संचालक प्रफुल्ल पाठक यावेळी उपस्थित होते.


       देशभर पसरलेल्या वीजेच्या जाळयावर पोसोको देखरेख व निरीक्षण करते. भौगोलिकदृष्टया देशाच्या दक्षिण व उत्तरेतील राज्यांना जोडणाऱ्या महाराष्ट्र राज्याची या

संस्थेच्याकार्याच्यादृष्टीने महत्वाची भूमिका आहे. ऊर्जा निर्मिती, पारेषण आणि वितरण करताना उच्चदाब वाहिन्यांवर अनेकदा दाब वाढतो. तो समतोल राहावा यादृष्टीने प्रयत्न आवश्यक असतात यासंबंधात महाराष्ट्राची वर्तमानस्थिती श्री. वाघमारे यांनी यावेळी जाणून घेतली. तसेच, याबाबत आवश्यक असणाऱ्या तातडीच्या सुधारणांबाबत त्यांनी माहिती घेतली. येत्याकाळात राज्यात अखंडित व गुणात्मक वीज पुरवठा करण्याच्यादृष्टीने करावयाच्या पायाभूत सुधारणांबाबतही  यावेळी  सकारात्मक  चर्चा  झाली. 


     राष्ट्रीय ऊर्जा ग्रीडचे एकात्मिक कार्य सुरक्षित पध्दतीने सुनिश्चित करण्याची महत्वाची जबाबदारी पोसोको संस्थेची आहे. यात पाच प्रादेशिक लोड डिस्पॅच सेंटर आणि राष्ट्रीय लोड डिस्पॅच सेंटर एनएलडीसी यांचाही समावेश आहे.                                   


              

No comments:

Post a Comment

Pages