6 जून रोजी नांदेड जिल्ह्यात "शिवस्वराज्य दिन" साजरा होणार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 4 June 2022

6 जून रोजी नांदेड जिल्ह्यात "शिवस्वराज्य दिन" साजरा होणार

नांदेड  दि. 4 :- छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी रायगडावर झाला होता. या महापुरुषांनी महाराष्ट्राला लोककल्याणकारी राज्याचा समृद्ध वारसा दिला. स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजेच शिवस्वराज्यभिषेक दिन म्हणून 6 जून हा दिवस कायम स्मरणात रहावा व या दिवसापासून प्रत्येक ग्रामपंचायतीला प्रेरणा घेता यावी या उद्देशाने 6 जून हा शिवराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्राने घेतला आहे. या निर्णयानुसार संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये "शिवस्वराज्य दिन" येत्या सोमवारी साजरा केला जाणार आहे. यादृष्टिने नांदेड जिल्हा परिषदेतर्फे जय्यत तयारी सुरू करण्यात आली असून पालकमंत्री अशोक चव्हाण यानिमित्ताने दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्वांशी संवाद साधणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांनी दिली. 


सोमवार 6 जून रोजी जिल्हा परिषदेतर्फे शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये सकाळी सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन त्यास अभिवादन केले जाईल. यानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करण्यात येईल. सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment

Pages