किनवट अंनिसच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन सादर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 23 August 2022

किनवट अंनिसच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन सादर

किनवट,दि.२३ : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यामध्ये काही धर्मांध शक्तीकडून निर्घृण खून करण्यात आला. या घटनेला ९ वर्ष पूर्ण झाली. खूनाचा तपास सध्या सीबीआय करत आहे. डॉ. दाभोलकर यांच्या खुनानंतर कॉ. गोविंद पानसरे डॉ. कलबुर्गी व गौरी लंकेश या विचारवंतांचे सुद्धा खून करण्यात आले. 

   या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंनिसच्याकिनवट शाखेच्या वतीने तसेच समविचारी विविध संघटनांच्या वतीने काल(ता.२२) तहसीलदार यांच्यामार्फत केंद्र व राज्य सरकारकडे खालील मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने खालील मागण्यांचा समावेश आहे.

१) डॉक्टर दाभोलकर यांच्या खुनामागच्या मुख्य सूत्रधारांचा शोध घ्यावा.

२) या खुणा मागच्या धर्मांध संघटनेवर कठोर कारवाई करण्यात यावी.

३) हा खून खटला जलद गतीने चालवून मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करावी.निवेदनावर एड. मिलिंद सर्पे, एड. टेकसिंग चव्हाण, एड. श्रीकृष्णा राठोड, एड. अजय राऊत, एडवोकेट गजानन पाटील, एड.रुपेश पुरुषोत्तमवार यांच्या सह्या आहेत.

No comments:

Post a Comment

Pages