खरीप पीकविम्याचे 49 हजार 258 प्रस्ताव ; किनवट तालुक्यात 32 हजार 478 हेक्टरवरील पिके संरक्षित - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 27 September 2022

खरीप पीकविम्याचे 49 हजार 258 प्रस्ताव ; किनवट तालुक्यात 32 हजार 478 हेक्टरवरील पिके संरक्षित

किनवट,दि.24 (प्रतिनिधी): किनवट तालुक्यात यंदा पंतप्रधान पीकविमा योजनेत विक्रमी अर्ज करण्यात आले असून, सहा पिकांसाठी तब्बल 49 हजार 258 शेतकर्‍यांनी  विमा काढलेला आहे. या सहा पिकांसाठी तालुक्यातील शेतकर्‍यांनी 03 कोटी 03 लाख 31 हजार रुपयांचा विमा हप्ता भरलेला आहे. त्यामुळे या शेतकर्‍यांच्या 32 हजार 478.1 हेक्टरवरील पिकांसाठी एक अब्ज 25 कोटी 68 लक्ष 21 हजार रुपयांचे विमा संरक्षण प्राप्त झालेले आहे,  अशी माहिती तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे यांनी  दिली.


     नांदेड जिल्ह्यात गतवर्षी पंतप्रधान पीकविमा योजना इफ्को टोकिओ जनरल इन्शुरन्स कंपनीद्वारे राबविली जात होती. गतवर्षी या कंपनीबद्दल शेतकर्‍यांच्या बर्‍याच तक्रारी होत्या. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील सोळाही तालुक्यात युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनीद्वारे पंतप्रधान खरीप पीकविमा योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत उडीद,कापूस, मूग, तूर, ज्वारी व सोयाबीन या सहा पिकांसाठी विमा भरण्याची अंतिम तारीख एक ऑगस्ट होती. जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे व तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे यांचे सततचे आवाहन व प्रयत्नांमुळे यंदा गतवर्षीपेक्षा तिप्पट जास्त शेतकर्‍यांनी पीकविमा काढलेला आहे.


   अतिपाऊस, दुष्काळ,वादळ आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास, हानीग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी ही पीकविमा योजना राबविली जात आहे. दरम्यान, गतवर्षीच्या खरीप हंगामात किनवट तालुक्यात पीकविम्यासाठी 16 हजार 307 शेतकर्‍यांनी आपले विमाअर्ज दाखल केले होते. त्या तुलनेत यंदा तिपटीपेक्षा जास्त अर्थात 49 हजार 258 शेतकर्‍यांनी अर्ज दाखल केले आहे. यात विमा घेतलेल्या या शेतकर्‍यांनी आपले 32 हजार 478.1 हेक्टर पिकांचे क्षेत्र संरक्षित केले असून, त्यापोटी शेतकर्‍यांनी 03 कोटी 03 लाख 31 हजार रुपयांचा विमा हप्ता तर राज्य व केंद्र सरकारने आपल्या सहभागाचा हिस्सा म्हणून प्रत्येकी 09 कोटी 78 लाख 50 हजाराचा विमा हप्ता भरलेला आहे. सर्वात जास्त विमा सोयाबीनचा घेतला गेला असून, त्या खालोखाल अनुक्रमे कापूस, मूग, उडीद, तूर व ज्वारी असा क्रम आहे.


विम्याची आकडेवारी दृष्टीक्षेपात...


मागील वर्षी सहभागी शेतकरी....................... 16,307


यंदा सहभागी झालेले शेतकरी........................ 49,258


गतवर्षी शेतकर्‍यांनी भरलेला विमा हप्ता..........09,13,89,885 रुपये


यंदा शेतकर्‍यांनी भरलेला विमाहप्ता...........  303.31 लाख रुपये


केंद्र सरकारने भरलेला विमा हप्ता.............. 978.50 लाख रुपये


राज्य सरकारने भरलेला विमा हप्ता............. 978.50 लाख रुपये


एकूण विमा हप्ता जमा...............................2260.31 लाख रुपये


किनवट तालुक्यातील विमा संरक्षित क्षेत्र.......32,478.08 हेक्टर


एकूण विमा संरक्षित रक्कम ....................1,25,68,21,000 रुपये
    किनवट तालुक्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांनी


         घेतलेल्या पीकविम्याचा तपशील


अनु.


क्रमांक


पिकाचे


नाव


विमा


भरलेल्या


शेतकऱ्यांची


संख्या


विमा


संरक्षित


क्षेत्र


हेक्टरमध्ये


विमा


हप्त्यापोटी


भरलेली


एकूण रक्कम


(लाखामध्ये)


विमा


परताव्यापोटी


मिळणारी


रक्कम


(लाखामध्ये)


1


उडीद


  6,654


  3,027.52


      52.68


     338.80


2


कापूस


  7,345


  4,204.41


    181.79


  1,731.40


3


मूग


  7,087


  3,236.50


      49.36


      366.61


4


तूर


  5,715


  2,643.76


      91.13


      502.41


5


ज्वारी


  1,581


     7,28.12


      14.16


      154.59


6


सोयाबीन


20,876


18,637.77


1,871.18


   9,474.40


 


एकूण


49,258


32,478.08


2,260.30


1,25,68.21

No comments:

Post a Comment

Pages