मुंबई दि.27 - महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा 66 वा वर्धापन दिन सोहळा येत्या दि.3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता भुसावळ मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदान ( जुने डी एस हायस्कुल मैदान) येथे साजरा करण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली आहे.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाची स्थापना 3 ऑक्टोबर 1957 रोजी स्थापना झाली होती.यंदा रिपब्लिकन पक्षाचा 66 वा वर्धापन दिन आहे. दरवर्षी ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन मोठया प्रमाणात साजरा होतो.दरवर्षी दि.3 ऑक्टोबरला भव्य जाहीर सभा मेळावा घेऊन रिपाइं चा वर्धापन दिन ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वात साजरा होतो. यंदा हा मान जळगाव जिल्ह्याला देण्यात आला असून जळगाव जिल्ह्यातील भुसावळ मध्ये यंदा रिपाइं चा 66 वा वर्धापन दिन साजरा होणार आहे.यापूर्वी हा मान शिर्डी अहमदनगर ;बीड;नागपूर ; पुणे आदी जिल्ह्यांना देण्यात आला आहे.यंदा भुसावळ मध्ये रिपाइं चा वर्धापन दिन साजरा होत असल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. भुसावळ मध्ये यंदा 66 व्या वर्धापन दिनी रिपाइं चे शक्तिप्रदर्शन घडविण्याचा आमचा संकल्प असल्याचे रिपाइं चे ज्येष्ठ नेते रमेश मकासरे आणि रिपाइं चे जळगाव जिल्हा अध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी माहिती दिली.
रिपब्लिकन पक्षाच्या 66 व्या वर्धापन दिन सोहळ्याचे उदघाटक म्हणून रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष रिपाइं चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे असून स्वागताध्यक्ष राज्य उपाध्यक्ष रमेश मकासरे आणि जिल्हा अध्यक्ष राजू सूर्यवंशी असणार आहेत. यावेळी राज्य मंत्री मंडळातील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील; ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन; पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील; खासदार रक्षा खडसे; खासदार उन्मेष पाटील;आमदार राजुमामा भोळे; आमदार संज्यभाऊ सावकारे; आमदार मंगेश चव्हाण आदि मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.; तसेच रिपाइं चे माजी मंत्री अविनाश महातेकर; भुपेश थुलकर; माजी आमदार सुमंतराव गायकवाड; बाबुराव कदम; गौतम सोनवणे; रिपाइं महिला आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांता सोनकांबळे; महिला आघाडी राष्ट्रीय सरचिटणीस आशाताई लांडगे; पप्पू कागदे ; सुरेश बारशिंग; श्रीकांत भालेराव; दयाळ बहादूर आदी अनेक मान्यबर उपस्थित राहणार आहेत.
No comments:
Post a Comment