महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या पुतळ्याचे मॉरिशस मध्ये अनावरण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 28 September 2022

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या पुतळ्याचे मॉरिशस मध्ये अनावरण

मुंबई दि. 28 -   भारतीय संविधान विश्वात सर्वश्रेष्ठ संविधान आहे. जगातील सर्वात मोठी संसदीय लोकशाही भारतात नांदत आहे.जाती धर्म भाषा प्रांत विविधतेने भारत नटला असून विविधता असून भारताची एकता आणि अखंडता आज मजबूत उभी आहे ती केवळ भारतीय संविधनानामुळे. संविधानाचे जनक महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर असून संपूर्ण जगाला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या समता स्वातंत्र्य विश्वबंधुता आणि न्यायाच्या विचारांची जगाला गरज आहे. त्यामुळे मॉरिशस मध्ये महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी मॉरिशस सरकार जमीन द्यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली.मॉरिशस मधील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट च्या प्रांगणात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या  मॉरिशस मधील पहिल्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी ना.रामदास आठवले बोलत होते.


यावेळी विचारमंचावर  मॉरिशस चे राष्ट्रपती  महामहिम पृथ्वीराजसिंग रूपन;उपस्थित होते.मॉरिशसचे उपपंतप्रधान लिलादेवी डुकून;  परराष्ट्रमंत्री एलन गणू;मॉरिशस  मराठी मंडळी फेडरेशनचे अध्यक्ष असंत गोविंद; मॉरिशस च्या मोका चे जिल्हा कौन्सिल चे  अध्यक्ष सुधीरचंद्र  सूनराने;  नितीन बाप्पू; आदी अनेक  मान्यवर  उपस्थित होते. फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळ भोर पुणे तर्फे  महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा  अर्धपुतळा मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन ला प्रदान करण्यात आला. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या या अर्धपुतळ्याचा  अनावरण सोहळा  मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन तर्फे मोका मॉरिशस मधील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट मध्ये  आयोजित केला होता.                  या कार्यक्रमास महाराष्ट्रातुन माजी मंत्री नितीन राऊत;ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे; पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे; प्राचार्य प्रकाश कुंभार;सुरेश गोरेगावकर ;सौ. सीमाताई आठवले;जित आठवले आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. 


मॉरिशस मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला पुतळा उभारल्या बद्दल येथील मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन  आणि मॉरिशस  सरकार चे ना.रामदास आठवले यांनी अभिनंदन केले. मॉरिशस मध्ये महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारावे त्यासाठी मॉरिशस सरकार ने जमीन द्यावी अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी मॉरिशस चे राष्ट्रपती महामहिम  पृथ्वीराज सिंग रूपन यांच्या कडे केली.येथे स्मारक आणि ग्रंथालय उभारल्यास या ग्रंथालयाला भारतातून  सरकार तर्फे मोठया प्रमाणात डॉ बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा पाठविण्यात येईल अशी घोषणा ना.रामदास आठवले यांनी केली. 


भारतीय संविधानातील मूल्ये ही सर्व जगाला प्रेरणा देणारी आहेत. संविधानाने दिलेल्या समता बंधुता या तत्वानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास या त्रिसूत्रीने काम करीत आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानुसार भारत सरकार ची वाटचाल सुरू असल्याचे यावेळी ना.रामदास आठवले म्हणाले. यावेळी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर  इंटरनॅशनल सोशल वर्क अवॉर्ड पुण्याचे माजी  उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे;प्रसन्न देशमुख;संतोष बारणे ;सुवर्णा पवार;सुरेश गोरेगावकर आदींना  मॉरिशस चे राष्ट्रपती महामहिम  पृथ्वीराजसिंग रूपन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 


No comments:

Post a Comment

Pages