नाशिक :
अखिल भारतीय समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा व बीएमए गुप यांच्या वतीने महाबौद्ध मेळावा ,महाश्रामणेर शिबिराचे दि.26 ते 5 दरम्यान गोल्फ क्लब मैदानावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
धर्मांतर घोषणा वर्धापनदिन आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या औचित्याने कर्मवीर दादासाहेब गायकवाड नगरीत एक हजार उपाकांचे महाश्रामणेर शिबिर तसेच महाबौद्ध धम्म मेळावा घेण्यात येत आहे.शिबिर व मेळाव्यास भदंत ज्ञानज्योती महाथेरो,भदंत सुगत, भदंत आर्यनाग, भदंत, शिलरत्न आदीसह देशभरातील भिक्कुगण उपस्थित राहणार आहेत. तसेच मनोजराजा गोसावी यांचा बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
याप्रसंगी उदघाटक म्हणून बौद्ध महासभेचे अध्यक्ष चंद्रबोधी पाटील, कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर ,महासचिव शंकरराव ढेंगळे उपस्थित राहणार आहेत.
शिबिराच्या ठिकाणी सभामंडप उभारणीसह ,शहरात ठिक ठोकणी झेंडे ,फलक लावण्यासह पूर्ण व्यवस्थाही पूर्णत्वास आलेली आहे अशी माहिती आयोजक व बीएमए ग्रुप चे अध्यक्ष मोहन अढागळे यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment