महाविहार परिवारातर्फे उद्या भंते विनयबोधीवप्रियजी यांची धम्मदेशना - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 8 September 2022

महाविहार परिवारातर्फे उद्या भंते विनयबोधीवप्रियजी यांची धम्मदेशना

नांदेड :महाविहार परिवार नांदेड च्या वतीने समाजाचे प्रबोधन व्हावे म्हणून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी एका ठराविक विषयावर अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे उद्या शनिवार दिनांक १० सप्टेबंर २०२२ रोजी  ठीक ४ वाजता  बौद्ध दर्शन शास्त्राचे गाढे अभ्यासक पूज्य भंते विनयबोधी  प्रियजी महास्थवीर यांच्या बौद्ध धम्माप्रति उपासकांचे उतरदायीत्व-भाग२ या विषयावर धम्मदेशनेचे आयोजन रमाई आंबेडकर बुद्ध विहार सह्योगनगर नांदेड येथे करण्यात आले आहे.

       तरी परिसरातील महिला पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहन्याचे आवाहन महाविहार परिवारचे संयोजक इंजि. यशवंतराव गच्चे, हिरामण वाघमारे, इंजी. बी. जी. पवार, साहेबराव पुंडगे, आदींनी केले आहे.


No comments:

Post a Comment

Pages