औरंगाबाद : येथील महात्मा फुले नगर मध्ये 66 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ.मिलिंद आठवले यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांतर्गत बौध्द धम्माचे गाढे अभ्यासक उत्तम भगत प्रमुख पाहुणे म्हणून सांगत होते की,भगवान गौतम बुद्ध यांच्या धम्माने जगाला शांततेचा संदेश देत एका नव्या समाजाची निर्मिती केलीआहे, प्रज्ञा, शील करुणा व मैत्री भाव जपला पाहिजे तरच आपण खऱ्या अर्थाने सुसंस्कारित पिढी घडवू शकतो,तसेच प्रत्येक घरात आज बौद्ध धम्म रुजविणे गरजेचे आहे असे प्रतिपादन बौद्ध धम्माचे जेष्ठ अभ्यासक उत्तम भगत यांनी केले.याप्रसंगी दिवंगत प्रा. पांडुरंग आठवले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मिलिंद आठवले यांनी केले,सूत्रसंचालन हनुमंत पाईक यांनी केले,पाहुण्यांचा परिचय गव्हांदे यांनी केला तर आभार प्रदर्शन प्राजक्ता आठवले यांनी केले,कार्यक्रमाला ऍड. रवींद्र तायडे, जावळे साहेब, प्रा. रवी गव्हांदे, डॉ. मुरलीधर इंगोले,प्रा. शिलवंत गोपणारायन,प्रा. युवराज आठवले,प्रमित आठवले व रक्षित आठवले हे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment