विपश्यना बुद्ध विहार बुद्ध लेणी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 6 October 2022

विपश्यना बुद्ध विहार बुद्ध लेणी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा


औरंगाबाद : 66 व्या धम्मचक्र  प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी नवयान बौद्ध धम्माची दिक्षा अशोक विजयादशमी दिनी घेतली. तो दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा होत असतो.औरंगाबाद येथील विपश्यना बुद्ध विहार  बुद्ध लेणी येथे दरवर्षी प्रमाणे हा सोहळा पार पडला.

भन्ते विशुद्धानंद यांचा हस्ते पंचशील ध्वजारोहण  झाले, भन्ते नागसेन भिक्खु  यांनी पंचशील,परित्राणपाठ ,धम्मदेसना तसेच 22 प्रतिज्ञा देण्यात उपस्थित जनसमुदायला दिले. 

यावेळी पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, उपायुक्त उज्वला बनकर ,भिमराव हत्तीअंबिरे यांनी हजेरी लावली होती.

खा. इम्तियाज जलील,माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी भेट देऊन विहार परिसराचा विकास करण्याचे आश्वासन दिले.

       सकाळी 12 वा. पासून शाहीर मेघानंद जाधव ,अजय देहाडे,कडुबाई खरात,राहुल अनविकर,विशाल मोरे  यांनी प्रबोधनात्मक भिमगीते सादर केली.सूत्रसंचालन राजाभाऊ शिरसाट यांनी केले.

सोहळ्याला औरंगाबाद शहर व परिसरातील बौद्ध बांधवांची उपस्थिती लक्षणीय होती.

हा सोहळा यशस्वी तेसाठी भन्ते विशुद्धनानंद बोधी, भन्ते नागसेन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांतोष वाघमारे, दीपक निकाळजे यांनी अथक परिश्रम घेतले.

1 comment:

Pages