दलित पॅंथर ही आग आहे, पिढ्यानपिढ्या जळत राहणार- डॉ.सुरज येंगडे - दलित पॅंथरचा सुवर्ण महोत्सव; तरुणांचा उस्पूर्त सहभाग - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 18 December 2022

दलित पॅंथर ही आग आहे, पिढ्यानपिढ्या जळत राहणार- डॉ.सुरज येंगडे - दलित पॅंथरचा सुवर्ण महोत्सव; तरुणांचा उस्पूर्त सहभाग

औरंगाबाद: दलीत पँथर अगोदरच काळ साहित्य विद्रोहाचा काळ आहे. साहित्यातून विचार तयार झाला विचारातून नवी ऊर्जा तयार झाली आणि नव्या ऊर्जेला पर्याय म्हणून  पॅंथरच निर्माण झालं. त्यानंतरने चार वर्ष मोठ्या ताकतीने काम केलं. पॅंथर मोठी होत गेली. नेतेही मोठे होत गेले.ज्या ठिकाणी अंन्याय अत्याचार व्हायचे त्या ठिकाणी पँथर जाणारा हे कळताच तेव्हा प्रस्थापितांच्या मनात थरकाप उडायचा असा धाक पँथरचा होता.मात्र आयडीयॉलोजी कारणाने पँथर बरखास्त करण्यात आली. यामध्ये विरोधकांचा हस्तक्षेप महत्त्वाचा होता. मात्र दलित पॅंथर ही आग आहे ही सहज विझत नाही ती पिढ्यानपिढ्या जळत राहणार आहे असेही येंगडे म्हणाले.

 दलित पॅंथरच्या पन्नासाव्या सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य सभागृहामध्ये रविवार दि.१८ रोजी शेवटचा दिवस होता.या यावेळी मार्गदर्शक म्हणून संशोधक डॉ. सुरज येंगडे जेष्ठ पत्रकार दिलीप मंडल पोलीस अधिकारी प्रवीण मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, पँथरच्या माध्यमातून तुमच्या पूर्वजांनी विषमतावादी लोकांच्या विरोधात लढे उभारले होतो.ते समाजाला सुधरवण्याचे आंदोलन होत.तुम्ही जेव्हा समाजाला सुधरवता तेव्हा तुम्ही देश सुधरवण्याच काम करत असता.यासाठी देश सुधरवणाऱ्या दलीत पँथरचे पन्नासावे वर्ष अभिमानाने साजरे करणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. तंबाखू, गुटखा यासारख्या पदार्थांची जाहिरात करणारे आजच्या तरुण पिढीचे आदर्श कसे असू शकतात.आजच्या चित्रपटांची खरापणे गेला आहे. इतर देशातील चित्रपटांचं अनुकरण करून इथले चित्रपट तयार केले जातात.हे चित्रपट तयार करणाऱ्यांनी ठरवलंय तुम्ही नवीन काही बघू शकतं नाही.यामुळे आजच्या तरुणाचे आदर्श हे व्यावस्थे विरुद्ध लढून स्वाभिमानाने जगायला लावणारे असावे असे सुरज येंगडे म्हणाले.

आंदोलनातून घरी पाठवण्याचा अर्थ कळाला....

डॉ. सुरज येंगडे म्हणाले, महाविद्यालयात असताना आमच्या परिसरात एक आंदोलन होत होत.त्यात मी सहभागी झालो.मात्र आमच्या परिसरातील लोकांनी मला त्या ठिकाणाहून घरी पाठवून दिलं.त्यावेळी मला अस वाटलं की मी तरुण आहे.आंदोलनात गरज पडली तर दगडही मारू शकतो, मग मला घरी का पाठवलं.मात्र मला उच्च शिक्षणासाठी विदेशात जायचं होत आणि त्यासाठी पासपोर्ट काढायची गरज पडली त्यावेळी मोठ्या लोकांनी घरी का पाठवलं त्याच खर कारण कळलं.


जेष्ठ पत्रकार दिलीप मंडल म्हणाले की, भारतीय दलीत पँथर ने करोडो लोकांच्या आयुष्यात न्याय मिळवून दिला.एखादी मुव्हमेंट म्हणजे अस नाही की लगेच त्याच काय इनपुट आहे. मुव्हमेंट पूर्ण झाल्यानंतर इनपुट मिळत असतात.सध्याच्या परिस्थितीत आपण आपल्या स्वप्नांची उंची वाढवणं गरजेच आहे.सध्याची परिस्थिती यासाठी अनुकूल नसेलही.मात्र पुर्वी च्या तुलनेत आपल्याकडे सध्या अनेक पर्याय उपलब्ध आहेत. दलीत पँथर म्हणजे असंतोषातून निर्माण झालेली चळवळ आहे.या चळवळीने समाजातील पीडितांना न्याय मिळवून दिला.

प्रस्ताविक सतीश पट्टेकर,सूत्रसंचालन राजेंद्र गोणारकर यांनी केले.


ह्यावेळी राहुल प्रधान, सचिन निकम,सिद्धार्थ शिंगारे,गुणरत्न सोनवणे,अतुल कांबळे, सिद्धार्थ मोरे,राहुल खंडागळे,प्रशांत बोराडे, भीमराव वाघमारे,भागवत चोपडे संदिप तूपसमुद्रे,जयेश पठाडे,राहुल वडमारे,आदींची उपस्थिती होती.


दुसऱ्या सत्रात लोकनाथ यशवंत,शेषराव धांडे,वनश्री वनकर यांनी कविता सादर केल्या.


महिला चळवळीवरील परिसंवादात डॉ.सुनीता सावरकर,योगिनी पगारे,वनश्री वनकर,डॉ.सोनाली म्हस्के यांनी आपले विचार मांडले.


सुशीला खडसे,प्राचार्य यशवंत खडसे,अमोल झोडपे,के व्ही मोरे,डॉ.प्रमोद दुथडे,डॉ.अविनाश सोनवणे,विलास जगताप,प्रा.सुरेश शेळके यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

सायंकाळी विपीन तातड यांनी वंदन माह्या भीमा,महिलांचे प्रश्न मांडणारे हॅपी वुमन्स दे,घे ना लॉकडाऊन हे   रॅप सादर करून महोत्सवात रंग भरले.

कैलास खानजोडे यांनी साकारलेली सुंदर रंगोळी चित्र उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

No comments:

Post a Comment

Pages