जयवर्धन भोसीकर , नांदेड :
तरोडा (बू)च्या माजी नगरसेविका तथा माजी ग्राम पंचायत सदस्या सौ.गंगाबाई नारायण कदम वय (65) यांचे कर्करोगाच्या दीर्घ आजाराने आज दिनांक 24 जानेवारी रोजी निधन झाले असून दिनांक 25 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता गोवर्धन घाट येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांचे राहते घर महसूल कॉलनी तरोडा बू येथून अंत्ययात्रा निघणार आहे. गंगाबाई कदम यांनी तरोडा भागाचे दोन वेळा ग्रामपंचायत सदस्य व दोन वेळा नगरसेविका म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. ते नायब तहसीलदार एन. के.कदम यांच्या पत्नी व काँग्रेस अनुसूचित विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष मंगेश कदम तसेच अँड.धम्मपाल कदम यांच्या मातोश्री होत.
त्यांच्या पश्चात पती, चार मुले,सुना,जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
No comments:
Post a Comment