शिक्षणशास्त्र , मानसशास्त्र व ललित कला विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 7 February 2023

शिक्षणशास्त्र , मानसशास्त्र व ललित कला विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर संपन्न

  औरंगाबाद प्रतिनिधी  :

                                         डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील या तिन्ही विभागाच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यापीठाचे आय .क्यू.ए .सी .संचालक डॉ . बंदेल सर यांनी केले .याप्रसंगी डॉ . प्रशांत पगारे डॉ .शिरीष आंबेकर डॉ . अपर्णा अष्टपुत्रे मॅडम आणि समन्वयक डॉ . सुहास पाठक तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ .रुबीना श्री पगारे सामाजिक कार्यकर्ते हे उपस्थित होते.  



    प्रास्ताविका डॉ .पाठक यांनी उपस्थित 180 हून अधिक रक्तदात्यांचे अभिनंदन करून सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे उपक्रम संस्कारशील ठरतील असे सांगितले तसेच आपण सर्वानी सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून रक्तदान शिबीरावर लक्ष केंद्रित करून हा शिबीर संपन्न करू असे आभार मानले . तसेच प्रास्ताविक करताना शिक्षण शास्त्र विभागात रक्तदान व वृक्षारोपन हे दोन उपक्रम 2005 पासून  सातत्याने राबवित असलेले माहिती दिली.      मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ . अपर्णा अष्टपुत्रे मॅडम यांनी रक्तदान हा आनंद उत्सव असल्याने सांगितले कारण आपण जेव्हा इतरांना खरा आनंद होतो तेव्हा खरा आनंद उत्सव आहे असे म्हणावे लागेल असे सांगितले .ललित कला विभाग प्रमुख डॉ . आंबेकर सर सर्वश्रेष्ठ पुण्य  हे रक्तदानाचे आहे असे उदबोधित  करून शुभेच्छा दिल्या .शिक्षण शास्त्र विभाग प्रमुख डॉ . पगारे सर यांनी या भूमीवर आपल्या दिलेल्या अनेक कर्तव्यापैकी हे श्रेष्ठ कर्तव्य आहे असे सांगितले व विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली .                       प्रमुख अतिथी डॉ . बंदेला सर यांनी मी भाग्यवान आहे कारण मी अशा सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन करत आहे ज्यात फक्त रक्त उपयोगाचे आहे .जात ,धर्म हे सर्व भेद नष्ट करून गोरगरीब गरजूंना उपलब्ध होणारे रक्तच हळूहळू एकात्मता  आणि राष्ट्रीयत्व निर्माण करू शकते .त्यामुळे मी आज पुण्यकामात सहभागी झाल्याचा आनंद व्यक्त केला .आम्ही हे उपक्रम लवकरच विद्यापीठ पातळीवर राबवू व सर्वात जास्त रक्तदाते उपलब्ध करून देण्याचा विक्रम करू असे आवाहन केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी कल्पना कांबळे यांनी केली तर आभार डॉक्टर पाठक यांनी व्यक्त केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विष्णू , योगिता बोरसे , दांडगे , थोरात , लोंढे ,सुभाष निकम , रावसाहेब दुधे , खान , रॉय, पंचशीला खरात   प्रा .  निपून इंगळे, डॉ . समता लोखंडे, डॉ. भाऊसाहेब देवकाते, पल्लवी पाटील , साईनाथ बनसोड , खरात , दिपाली खरात , डॉ. पेरकर व तिन्ही विभागाच्या विद्यार्थ्यानी परिश्रम घेतले. रक्तदानानंतर संयोजकाच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले .

No comments:

Post a Comment

Pages