’जी-२०’ युनिर्व्हसिटी कनेक्ट’चे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 16 February 2023

’जी-२०’ युनिर्व्हसिटी कनेक्ट’चे आयोजन

औरंगाबाद :

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ’जी-२०’ युनिर्व्हसिटी कनेक्ट-एंगोजिंग यंग मांईडस’ अंतर्गत शुक्रवारी दि.१७ विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.


विद्यापीठातील नाटयगृहात शुक्रवारी सकाळी १० ते २ दरम्यान हा कार्यक्रम होत आहे. ’जी-२०’ द मल्टी डायमेन्शनल पर्सपेक्टिव्ह ऑफ सायंटिफिक अ‍ॅण्ड कल्चरल हेरिटेज’ हा परिषदेचा मुख्य विषय आहे. यावेळी मॅनेजरसिंग (माजी महासंचालक, एनआरएलसी, लखनौ) व डॉ.ज्योती चंदारमानी (संचालक, सिम्बॉससिस विद्यापीठ) यांचे व्याख्यान होईल तर संरक्षण तज्ज्ञ डॉ.विजय खरे (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांचे विशेष व्याख्यान होईल. मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले अध्यक्षस्थानी राहणार आहेत. यावेळी प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे, नोडल ऑफीसर डॉ.मुस्तजीब खान, सन्वयक डॉ.बीना सेंगर, डॉ.संयतन घोषाल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास विद्यापीठातील, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, पदव्यूत्तर रासेयो स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. या निमित्ताने १० ते ११ फेब्रुवारी रोजी विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा, पोस्टर मेकींग स्पर्धा, बिझनेस आयडिया कॉन्टेस्टट आदी स्पर्धा भारती युवा ट्रस्टच्या सहकार्याने घेण्यात आली. शंभरहून अधिक विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले. ’जी-२०’ परिषदेचे ’वसुदैव कुटूंबकम’ हे बोधवाक्य असून ’जी-२०’ बहुउद्देशिय आयामी दृष्टीकोन-.शाश्वत विकासासाठी वैज्ञानिक आणि सांस्कृतिक वारसा हा स्पर्धेकरिता व व्याख्यानमालेचा मुख्य विषय आहे. ’जी-२०’परिषदेनिमित्त शाश्वत विकास, पर्यावरणस्नेही जीवन शैली, क्लायमेट चेंज व ग्लोबल सेक्युरिटी’ आदी विषयावर व्याख्याने होणार आहेत.


विद्यापीठासाठी आनंदाचा क्षण : मा.कुलगुरु

मराठवाडयाचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा अत्यंत संपन्न आहे. ’जी-२०’ परिषदेचे यजमानपद भारताला मिळाले, ही आनंदाची बाब आहे. असेही मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले म्हणाले. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या स्पर्धेत मराठवाडयास तसेच आपल्या विद्यापीठास सहभागी करुन घेण्यात आले, ही अभिमानाची गोष्ट आहे, असेही मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले म्हणाले.No comments:

Post a Comment

Pages