सेक्युलर मुव्हमेंट च्या वतीने औरंगाबाद येथे धर्मांतरबंदी कायद्याविरोधात जनजागृती परिषद - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 12 February 2023

सेक्युलर मुव्हमेंट च्या वतीने औरंगाबाद येथे धर्मांतरबंदी कायद्याविरोधात जनजागृती परिषद

किनवट ,दि.१२ : राज्यात धर्मांतरबंदी कायदा करण्याची मागणी होत आहे. त्याला विरोध करण्यासाठी सेक्युलर मुव्हमेंट,आंबेडकरवादी व पुरोगामी संघटनांनी पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून औरंगाबाद, येथे 'सेक्युलर मुव्हमेंट',या सामाजिक संघटनेच्या वतीने ता.१९ रोजी आमखास मैदानावरील डॉ . बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात धर्मांतरबंदी कायद्याच्या विरोधात जनजागरण परिषद घेण्यात येणार आहे, अशी माहिती सेक्युलर मुव्हमेंट चे जिल्हाध्यक्ष आणि राज्य  समितीचे सदस्य  अॅड.मिलिंद सर्पे यांनी दिली.

सेक्युलर मुव्हमेंट व महाराष्ट्रातील तरुण चित्रकारांचा समावेश असलेल्या सेक्युलर आर्ट मुव्हमेंट यांच्या वतीने व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सहभागाने  औरंगाबादेत ता.१९फेब्रुवारी रोजी सांविधानिक धार्मिक स्वातंत्र्य हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. फुले-आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या  या परिषदेत जेष्ठ  विधिज्ञ अॅड.शिवाजीराव शिंदे, सेक्युलर मुव्हमेंट चे कार्याध्यक्ष भरत शेळके, वंचित बहुजन आघाडी औरंगाबादचे माजी जिल्हाध्यक्ष महेश निनाळे व जेष्ठ पत्रकार मधु कांबळे हे मार्गदर्शन करणार आहेत.

  लव्ह जिहादसारख्या काल्पनिक, खोट्या सबबी पुढे करून नागरिकांना त्यांच्या इच्छेप्रमाणे धर्म निवडण्याच्या घटनात्मक अधिकारावर घाला घालणारा धर्मांतरबंदी कायदा राज्यात आणण्याचा घाट घातला जात आहे, परंतु, असा कायदा होऊ दिला जाणार नाही, असा इशारा परिषदेत देण्यात येणार असल्याचे ही अॅड.सर्पे यांनी सांगितले.


No comments:

Post a Comment

Pages