किनवट,दि.६: अभिवक्ता संघाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी अॅड.राहुल सोनकांबळे, उपाध्यक्षपदी श्रीकृष्णा राठोड यांची,तर सचिवपदी अॅड.सुनिल सिरपुरे यांची निवड झाली.कार्यकारिणीचे अन्य पदाधिकारी असे; सहसचिव अॅड.सुरेश मुसळे, कोषाध्यक्ष अॅड.एम.एस.बडगुजर व ग्रंथपाल अॅड.डाॅ.सागर शिल्लेवार
अध्यक्षपदासाठी व उपाध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीतून अध्यक्षपदी अॅड. आर. डी. सोनकांबळे यांची, तर उपाध्यक्षपदी अॅड. श्रीकृष्णा राठोड यांची निवड झाली आहे.
अध्यक्ष पदासाठी अॅड. आर. डी. सोनकांबळे व अॅड. के. के. मुनेश्वर हे रिंगणात होते. अभिवक्ता संघाच्या ५० सदस्यांपैकी ४९ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात अॅड. आर. डी. सोनकांबळे यांना २८ तर त्यांचे प्रतिस्पर्धी ॲड. के. के. मुनेश्वर यांना २१ मते मिळाली. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत अॅड. कृष्णा राठोड व अॅड. विलास शामिले हे दोघे होते.ॲड.
कृष्णा राठोड यांना २५ तर अॅड. विलास शामिले यांना २४ मते मिळाली. अॅड. कृष्णा राठोड यांना निसटता विजय मिळाला. पिठासन अधिकारी म्हणून वरिष्ठ अॅड. एस. डी. राठोड, अॅड. बिपिन पवार आणि अॅड. सुनील येरेकर यांनी काम पाहिले.२०२३ ते २०२५ या कालावधीसाठी अभिवक्ता संघाची ही निवड झाली. निवडणूक प्रक्रिया अभिवक्ता संघाच्या कार्यालयात पार पडली.
No comments:
Post a Comment