गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी युवकांनी पुढाकार घेतले पाहिजे -दीपक बोरसे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 6 February 2023

गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी युवकांनी पुढाकार घेतले पाहिजे -दीपक बोरसे

 किनवट,ता.६(बातमीदार): समाजामध्ये आज मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चाललेली आहे. ही गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार  घेतला पाहिजे, असे आवाहन पोलिस निरीक्षक दीपक बोरसे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित विशेष निवासी शिबिर उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले .                        

 बळीराम पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष निवासी शिबिराचे आयोजन २ ते ८ फेब्रुवारी दरम्यान मांडवा(ता. किनवट) येथे करण्यात आले. विशेष निवासी शिबिराचे उद्घाटक तथा अध्यक्ष म्हणून पोलीस निरीक्षक दीपक बोरसे हे होते.यावेळी प्रमुख उपस्थिती किनवट शिक्षण संस्थेचे सदस्य गंगारेड्डी बैनमवार , प्राचार्य डॉ .शिवराज बेंबरेकर , मांडवा येथील उपसरपंच देवराव यंड्रलवार , किशोर कासाडीवार , अनिल भंडारे , नरसिंग इरपेनवार , गोविंद आत्राम , कृष्णा नडकुटंलवार , सुमाता , मेघा , जि. प . शाळेचे डवरे  , तामगाडगे  ,पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील ,कॅप्टन काजी , प्रा शेषराव माने , प्रा. पुरुषोत्तम येरडलावार , प्रा . सुलोचना जाधव , डॉ . लता पेंडलवाड , प्रा. स्वाती कुरमे , प्रा .वाघमारे , प्रा.मिरासे ,पिंपरे , व्यंकटेश आदींची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी सुरुवातीला समूहगीताने उपस्थितांचे स्वागत केले . त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर . राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुष्प पूजन केल्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले .  

 याप्रसंगी गंगारेड्डी बैनमवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .उद्घाटन कार्यक्रमापूर्वी विद्यार्थ्यांनी गावामध्ये प्रभात फेरी काढून स्वच्छता , आरोग्य ,बालविवाह , पर्यावरण याविषयी जनजागृती केली. प्रभात फेरीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी निखिल खराटे,गोपुलवाड,अश्विनी झाडे ,करण वर्मा ,येईलवाड आदींनी सक्रिय सहभाग नोंदवला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. शेषराव माने यांनी  केले,तर आभार कार्यक्रम अधिकारी प्रा.पुरुषोत्तम येरडलावार यांनी मांनले. या  कार्यक्रमाला गावातील नागरिक जिल्हा परिषद शाळेतील व सरस्वती विद्यामंदिर येथील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages