भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी शिवम सोनकांबळे यांची निवड ;२३ एप्रिल रविवार रोजी सोलापुरात होणार जयंती सोहळा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 3 April 2023

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी शिवम सोनकांबळे यांची निवड ;२३ एप्रिल रविवार रोजी सोलापुरात होणार जयंती सोहळा

सोलापूर :

सालाबाद प्रमाणे ३१ मार्च शुक्रवार रोजी एम्प्लॉयमेंट चौक येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हायस्कूलच्या मैदानात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव व विश्वस्त समिती यांची 2023 ची वार्षिक नियोजन बैठक मोठ्या चैतन्यपूर्ण वातावरणात पार पडली.

यंदाच्या वर्षी मध्यवर्ती उत्सव विश्वस्त समितीत ४२५ पेक्षा अधिक सार्वजनिक मंडळे सहभागी होणार असून १५० मिरवणूक निघतील अशी माहिती अध्यक्ष शिवम सोनकांबळे यांनी दिली.

सदर बैठकीची सुरुवात भगवान बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन करण्यात आली, 2023 वार्षिक बैठक मावळते उत्सव अध्यक्ष  अजित गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

बैठकीत 2022 चा जमा खर्च सादर करण्यात आला, त्याचं प्रमाणे 2023 भिम जयंती उत्सवाचा सप्ताह ठरवून,यंदाची जयंती ही सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक आदी क्षेत्रात कार्यक्रम करून साजरा करावी असे मध्यवर्ती च्या वतीने आदेश देण्यात आले.

सर्व मंडळांच्या मागे विश्वस्त समिती ही आज पर्यंत जशी खंबीरपणे उभी आहे तशीच येणाऱ्या काळात आपल्या सोबत असेल असे अश्वस्त केले. 


तसेच रमाई यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सव वर्षा निमित्त महिला सक्षमीकरणासाठी कार्य करण्याचे आवाहन मध्यवर्तीच्या वतीने करण्यात आले,


यंदाच्या वर्षी अध्यक्ष पदी  शिवम सोनकांबळे यांची तर कार्याध्यक्ष पदी  वैशाली उबाळे तसेच सचिव म्हणून  अंकुश मडीखांबे,कोषाध्यक्ष म्हणून रवी कदम तर ऑडिटर पदी  प्रवीण कांबळे यांची 

सर्वांनू मते निवड करण्यात आली व सत्कार करण्यात आला.

सदर बैठकी मध्ये सामाजिक संस्था,मंडळे,कार्यकर्त्यांच्या वतीने मध्यवर्ती समितीस स्वखुशीने #सभासद_वर्गणी जमा करण्यात आली.

या बैठकीस  राजाभाऊ सरवदे,सुभानजी बनसोडे,राजाभाऊ इंगळे,सुबोध वाघमोडे,राहुल सरवदे,

प्रवीण निकाळजे,संजीव सदाफुले,अतुल नागटिळक,

राजा कदम,शशी कांबळे,रवी गायकवाड,अजित गायकवाड,अंजना गायकवाड,विजय पोटफोडे,भारत वडवेराव,बंटी रणखांबे,राजा सोनकांबळे,विश्वास तळभंडारे,राहुल शंके,सुशील सरवदे,नागेश रणखांबे,सूरज निकंबे,विजय सोनवणे,शशी तळमोहिते,मदन वडावराव,शरणू हजारे,पिंटू ढावरे,यशपाल सोनकांबळे,बापु सदाफुले,खंडू साबळे,महेश गजधाने,दावला सुर्वे,अतिश शिरसठ,गौतम कसबे,जयप्रकाश भंडारे,नागनाथ बंगाळे,अनिल आठवले,सचिन कांबळे,निलेश भंडारे,मधुकर आठवले,बापु शिवशरण,महादेव कांबळे,दिपक शिंदे,महादेव बाबरे,श्याम धुरी,धर्मेंद्र चंदनशिवे,चंद्रसेन जाधव,सुमित शिवशरण,विक्रांत गायकवाड,अतिश बनसोडे,अनिल सरवदे,बंटी गायकवाड,समाधान आवळे,आकाश साबळे,उमेश काळे,विशाल कांबळे,रोहित खिलारे,सोहन लोंढे,अमोल धेंडे,सौदागर क्षीरसागर,महेश पवार,हिरामणी रोकडे,अमर भालेराव,बाळू थोरात,अमोल सोनवणे आदी आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते,मंडळातील सर्व अध्यक्ष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages