नांदेड /प्रतिनिधी :
भगवान गौतम बुध्द यांच्या जयंती निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल अँड कल्चरल मुहमेंट नांदेड निर्मित संगीतकार प्रमोदकुमार गजभारे प्रस्तुत बुध्द पहाट संगीतमय कार्यक्रम उद्या दि.५ रोजी पहाटे ५ वाजता कै.डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे आयोजित करण्यात आला आहे.कार्यक्रमास अनेक मान्यवर अतिथी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन जिल्हाधिकारी अभिजित राऊत,जि.प.च्या मुख्यकार्यकारी अधिकारी सौ.वर्षा ठाकुर-घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, आयुक्त डॉ.सुनील लहाने
आंबेडकरी चळवळतील ज्येष्ठ नेते सुरेशदादा गायकवाड,मंत्रालयीन अधिकारी कर्मचारी संघटनेचे नेते भारतजी वानखेडे,नवी मुंबई सिडकोच्या अधिकारी सौ.सविता शिंदे,विजय नांदेकर,पिपल्स रिपलीकन पक्षाचे महासचीव बापुराव गजभारे,डाॅ.करुणा जमदाडे डाॅ.उत्तम सोनकाबंळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सदर कार्यक्रम डॉ बाबासाहेब आंबेडकर सोशल अँड कल्चरल मुव्हमेंट नांदेड व महाराष्ट्र बहुजन शिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.कार्यक्रमाचे सलग पंधरावे वर्षे आहे.कार्यक्रमास अनेक नामवंत पाहुणे, कलावंतांनी हजेरी लावली आहे.यावर्षी महाराष्ट्रातील प्रख्यात बुद्ध-भीम गीत गझल गायक राहुल देव कदम, प्रख्यात गायिका संगीता भावसार यांच्या सुमधुर गायनाने बुद्ध पहाट रंगणार आहे.तर प्रसिद्ध निवेदक रवी केसकर यांच्या अभ्यासपूर्ण निवेदनाने पहाट रंगणार आहे.
कार्यक्रम बुद्ध धम्म अनुयायांचा लोकप्रिय कार्यक्रम असून यावर्षी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
निर्माता प्रमोदकुमार गजभारे,संयोजन समिती अध्यक्ष रोहिदास कांबळे, मार्गदर्शक जेष्ठ पत्रकार प्रकाश कांबळे, सुभाष लोणे,उपाध्यक्ष आर. बी. मादळे,सचिव टी.पी. वाघमारे,सहसचिव दिनेश सूर्यवंशी,कोषाध्यक्ष इंजि. भरत कुमार कानिंदे,
संघटक यशवंत कांबळे,सदस्य नंदकुमार कांबळे सिंदगीकर,उज्वला सुर्यवंशी (ऐडके),डी.एल. भिसे,बी.आर. धनजकर, वसंत दिग्रसकर,पंडीत आढाव, धर्मेन्द्र कांबळे, देविदास ढवळे,राजकुमार स्वामी, संजय रत्नपारखी ,भगवान गायकवाड, गजानंन कानडे,संघरत्न कोकरे,संजय बुक्तरे,अरुण केसराळीकर,बालाजी कांबळे, नागोराव ढवळे,दिलीप हनुमंते,प्रा.शुध्दोधन गायकवाड,प्रा.डॉ. जे.टी.जाधव,इंजि.वसंत वीर आदी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत धम्म बाधवानी शुभ्र वस्त्र परिधान करून कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थीत राहवे आसे आवाहान संयोजन समीती व प्रसिद्धी प्रमुख सुभाष लोणे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment