मुख्य सचिव मनोज सैनिक यांची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट जिल्ह्यातील विविध प्रकल्पांची दिली माहिती - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 9 May 2023

मुख्य सचिव मनोज सैनिक यांची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट जिल्ह्यातील विविध प्रकल्पांची दिली माहिती

  औरंगाबाद : – राज्याचे मुख्य सचिव मनोज सैनिक यांची जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमचार (दि.8) रोजी सदिच्छा भेट घेतली. यावेळी जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पाची माहिती मुख्य सचिवांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.  गावातील शेवटच्या घरापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहचला जावा तसेच पात्र लाभर्थ्यांना थेट लाभ उपलब्ध करुन देण्यासाठी राबविण्यात येत असलेला “शासकीय योजनांची जत्रा,” शेतकऱ्यांच्या आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक स्थिती जाणून घेण्यासाठी करण्यात येत असलेले ‘बळीराजा सर्वेक्षण,’ शहरातील पाणीपुरवठा योजना, नवीन वाळू धोरण, खरीपाचे नियोजन, संत ज्ञानेश्वर उद्यानाचे नुतनीकरण तसेच नियोजित प्रशासकीय इमारतीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.  यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य सचिवांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


No comments:

Post a Comment

Pages