ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 10 May 2023

ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप

नायगाव :

  विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन हृदयसम्राट  ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस स्वाभिमानी दिवस म्हणून साजरा केला जातो. बाळासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

         त्यावेळी वंचित बहुजन युवा आघाडी नांदेड ( दक्षिण) जिल्हा उपाध्यक्ष दिपक गजभारे घुंगराळेकर  व जिल्हा सचिव बालाजी गायकवाड , नायगाव ता.महासाचिव साहेबराव कोपरेकर ,तालुकाध्यक्ष सतिश वाघमारे ,प्रभाकर घंटेवाड , महिला तालुकाध्यक्षा रेखाताई देवकर जिल्हा उपाध्यक्षा ममता भद्रे व प्रताप बंडे, राजेन्द्र कांबळे, पंडीत पत्रकार वाघमारे, माधव रिजितवाड, सचिन गजभारे, धम्मपाल ढवळे,  श्री.सोनसळे आदी पदाधिकाऱ्यांसाह नायगाव ग्रामीण रुग्णालयातील  वैद्यकीय अधिकारी  नायक सर , व परिचारिका इतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages