किनवट,दि.05(प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 63 वा वर्धापनदिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. मृणाल जाधव यांच्या हस्ते नगर परिषद प्रांगणात सकाळी 7.10 वाजता पार पडल्यानंतर शासनाकडून प्राप्त झालेले घंटागाडी व मिनी ट्रॅक्टरच्या लोकार्पणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
शहरातील नागरिकांना मूलभूत सोई-सुविधा पुरविण्याकरिता पालिकेच्या आरोग्य विभागासाठी शासनाकडून प्राप्त झालेले घंटागाडी व मिनी ट्रॅक्टरचा लोकार्पणाचा कार्यक्रम मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ.मृणाल जाधव यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर पालिकेच्या आरोग्य विभागातील सफाई कर्मचा-यांना सुरक्षा कीटचे वाटप करण्यात आले. या सुरक्षा कीटमध्ये गमबूट, जॅकेट, हॅन्डग्लोव्हज् व इतर सुरक्षा साहित्य देण्यात आले. तसेच आंतरराष्ट्रीय कामगारदिना निमित्त सफाई कर्मचा-यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी पालिकेचे माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार व माजी नगर सेवक अभय महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, नगर परिषदेचे कार्यालय अधीक्षक चंद्रकांत दुधारे, लेखापाल अनिल बिराजदार, भांडारपाल प्रशांत कुमरे, पा.पु. अभियंता अशोक भालेराव, विद्युत अभियंता विनोद पवार, विकास योजनाप्रमुख अभिजीत मिरकले, रोखपाल अजहरअली ताहेरअली यांनीही सर्व वाहनांचे पुष्पपूजन केले.
या कार्यक्रमास नगर परिषदेचे सर्व विभागप्रमुख, आरोग्य विभाग, अग्नीशमन विभाग व पाणी पुरवठा विभागातील सर्व कर्मचारी हजर होते.
No comments:
Post a Comment