नवा मोंढा नांदेड परीसरात पोलीस चौकी उभारावी - स्वप्निल इंगले पाटील - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 4 May 2023

नवा मोंढा नांदेड परीसरात पोलीस चौकी उभारावी - स्वप्निल इंगले पाटील

नांदेड  :

नवा मोंढा नांदेड येथे पोलीस चौकी उभारावी या मागनी चे निवेदन राष्ट्रवादी युवक चे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारनी सद्यस इंजी स्वप्निल पाटील यांनी महाराष्ट्र चे गृहमंत्री यांना दिले आहे.

     नवा मोंढा नांदेड जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ आहे येथे मोठ्या प्रमाणात आड़त व्यापाऱ्यांची दुकाने , कृषी उत्पन्न बाजार समिती , अनेक बँका , शासकीय कार्यालय ,फर्टीलायझर्सची दुकाने ,अनेक खाजगी शिकवणी व अभ्यासिका आहेत त्यामुळे या भागात दैनंदिन हजारो नागरिक तसेच विद्यार्थ्यांची आवक जावक असते मागील काही दिवसात या भागात विद्यार्थ्यांचे मोबाईल लुटीचे , चोरीचे तसेच व्यापाऱ्यांचे पैसे लुटण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत तसेच या भागात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात रात्री तळीमारांच्या टोळ्या मोठ्या प्रमाणात बैठक करून असतात त्यामुळे रात्री या भागातील नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे या भागात एक कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारण्याची मागणी या भागातील नागरिकांकडून होत आहे. 

पोलीस चौकी उभारन्यासाठी या भागातील नागरीकांन सोबत पोलीस अधीक्षक साहेब यांची भेट लवकरच घेनार असे स्वप्निल पाटिल यांनी महिती दिली.


                         

No comments:

Post a Comment

Pages