किनवट,ता.८(बातमीदार) : कमठाला(ता.किनवट) केंद्रांतर्गत लोणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यातून शालेय मंत्रिमंडळासाठी निवडणूक घेण्यात आली. लोकशाही आणि मतांच्या मुल्यांची रुजवणूक व्हावी यासाठी मतदान प्रक्रिया पूर्ण करून " शालेय मंत्रीमंडळ " तयार करण्यात आले.
शालेय मंत्रीमंडळात मुख्यमंत्री - प्रतिक नंदकिशोर गुंजकर, उपमुख्यमंत्री - पूर्वी रामकिसन धुर्वे, शिक्षणमंत्री - ज्योती राम कोसरे, सांस्कृतिक मंत्री - श्रृती रघूनाथ काळे, क्रीडामंत्री - रोहण सोळंके आणि निशांत खरे, पर्यावरणमंत्री ( स्वच्छता ) - ऋषीकेश सोळंके आणि गणेश गेडाम, पर्यटनमंत्री ( सहल ) - सम्रदा मारोती बादड आणि रुपाली प्रकाश पवार हे विद्यार्थी विजयी झाले. शाळेत सर्वच विद्यार्थांनी मतदान केले होते.
शालेय मंत्रीमंडळाच्या निवडणूकीची सूचना देऊन विद्यार्थांचे उमेदवारी अर्ज घेण्यात आले. दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष निवडणूक आणि त्याच दिवसी निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी मतदान अधिकारी म्हणून अंकुश राऊत या शिक्षकांनी काम पाहिले, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रमेश मुनेश्वर या शिक्षकाने कर्तव्य बजावले, राहूल तामगाडगे या शिक्षकांने विजय उमेदवारांना शपथ दिली, तर विद्या श्रीमेवार या शिक्षिकेने मतदान सुरळीत होण्यासाठी प्रयत्न केले. मतदान प्रक्रिया सुरू असतांना शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन लोंढे यांनी भेट दिली. विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कामाची जबाबदारी देण्यात आली.
No comments:
Post a Comment