महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोकुंदा, किनवट येथे, जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र पडताळणी शिबिर संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 18 July 2023

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोकुंदा, किनवट येथे, जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र पडताळणी शिबिर संपन्न

किनवट : 

मा.महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे व मा.आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राजश्री शाहू महाराज जंयती पर्वा निमित्य दि.26 जून 2023 ते 26 जुलै 2023 या कालावधीत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी तालुकानिहाय मार्गदर्शन शिबीर व जात वैधता प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग) जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोकुंदा, किनवट येथे 18 जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता.


यावेळी मंचावर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नांदेडचे एम. एस. मुळे. लघुलेखक उच्चश्रेणी, संजय पाटील, कनिष्ठ लिपिक, नांदेड, मुख्याध्यापक तथा प्राचार्य एच.ए.शेख , उपप्राचार्य एस. के. राऊत, पर्यवेक्षक प्रा. संतोषसिंह बैसठाकुर व विज्ञान विभाग प्रमुख प्रा. आर.वी. इंगळे आदी उपस्थित होते.


प्रारंभी मान्यवरच्या हस्ते राजश्री शाहू महाराजांच्या व डॉ.बाबासाहेब आंबेडकर  यांच्या प्रतिमाचे दीप-धूप-पूष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यानंतर महाविद्यालयाचे जात पडताळणी विभाग प्रमुख प्रा. मिलिंद सोनकांबळे यांनी मान्यवराचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. कार्याक्रमाचे प्रास्ताविक डाॅ.प्रा. हेमंत सोनकांबळे यांनी केले.


या शिबिरास मार्गदर्शन करतांना मा.एम.एस. मुळे यांनी शिबिरामागची भूमिका मांडली. 26 जून ते 26 जुलै या कालावधीत शालेय स्तरावर सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात

प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत मिळवण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने विशेष मोहिम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी तालुकानिहाय विशेष शिबिरे आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती त्यांनी दिली.


मा. संजय पाटील यांनी 2023-24 या शैक्षणिक वर्षातील प्रवेशित इयत्ता अकरावी व बारावी विज्ञान शाखेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र मुदतीत मिळवण्याकरिता काय-काय अडचनी निर्माण होतात व त्या कशा पध्दतीने त्या सोडवाव्यात यासंबंधी मार्गदर्शन केले.


या मार्गदर्शन शिबीर व जात वैधता प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमास मोठ्या संख्येने किनवट तालुक्यातील अनेक कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी व पालकांनी हजेरी लावली होती. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रा. हेमंत सोनकांबळे यांनी केले तर आभार प्रा. सुबोध सर्पे यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Pages