नांदेड येथे लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने भव्य एल्गार परिषदेचे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 29 July 2023

नांदेड येथे लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने भव्य एल्गार परिषदेचे आयोजन

     नांदेड ,राघोबा वाघमारे :  लोकस्वराज्य आंदोलन या सामाजिक संघटनेच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे १०३ व्या जयंतीनिमित्त १ आॅगष्ट २०२३ रोजी वंचित,शोषीत,अन्यायग्रस्तांच्या हक्कासाठी संस्थापक अध्यक्ष प्रा.रामचंद्र भरांडे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य एल्गार परिषदेचे आयोजन अण्णाभाऊ साठे पुतळा नांदेड येथे करण्यात आले असल्याची माहिती  अंकुश गायकवाड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.

 

     या भव्य एल्गार परिषदेला अ. भा. गुरू रविदास  समता परिषद संस्थापक अध्यक्ष इंजिनियर चंद्रप्रकाश देगलूरकर,कामगार आघाडी प्रदेशाध्यक्ष रावसाहेबदादा पवार,व्ही.जी.डोईवाड,अॅड.दत्तराज गायकवाड,एन.जी.पोतरे,जेष्ट साहित्यिक नागोराव नामेवार,रा.ना.मेटकर,समतावादी एम्प्लॉईज आॅर्गनायझेशन बालाजी पाटोळे,बी.एम.गोणारकर,डी.एन.शेळके,

एकनाथ रेडे,आदी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

 लोकस्वराज्य आंदोलन जिल्हाशाखा यांच्या वतीने साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा क्रांतीकारी विचार इथल्या शोषित,वंचित,पददलीत आदिवासी,महिला,कामगार,यांच्या जिवनात ऐतिहासिक बद्दल घडवून आणण्यासाठी या महामानवांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचाराचे जागरण जनमानसात घडवून आणण्यासाठी चर्चा व नियोजन करण्यात येणार आहे.तरी या भव्य एल्गार परिषदेला नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पंडीत वाघमारे,सचिन वाघमारे,नागोराव कुडके,संतोष तेलंग,संदिप मेटकर,बाळासाहेब टिकेकर,साईप्रसाद जळपतराव,माणिक कांबळे,पी.जी.केदारे,धोंडोपंत बनसोडे,नागोराव कमलाकर,लक्ष्मण निदानकर,नारायण इबीतवार,गंगाधर सिंधलोन,यादव कुडकेकर,संभाजी वाघमारे,कैलास सूर्यवंशी,साहेबराव गव्हाळकर,देविदास सुर्यवंशी,दिनेश सुर्यवंशी,पुजा मोरे,गंगासागर टोम्पें,आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
No comments:

Post a Comment

Pages