नांदेड दि. 28 -
महाविहार परिवारातर्फे भारतीय संविधान या विषयावर महाराष्ट्रातील विचारवंत, इंजिनीअर, डॉक्टर, कार्यकर्ता, अॅड. भीमराव हटकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात येत आहे. या श्रृखंलेतील तिसरे पुष्प शनिवार, दि. 29 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार सह्योगनगर, नांदेड येथे संपन्न होणार आहे. सध्या देशभरात बहुचर्चित असलेल्या समान नागरी कायदा हा विषय अतिशय महत्त्वाचा असून संविधानातील तरतुदींचा नुसार या कायद्याचा उहापोह करण्यासाठी या अभ्यासवर्गाचे प्रयोजन आहे. या अभ्यासवर्गात या निमित्ताने साधकबाधक चर्चा होणे अपेक्षित असून अशा सुवर्णसंधीचा फायदा नांदेडकर जनतेस निश्चितच होणार आहे.
तरी महाविहार परिवारातील सर्व सदस्य व परिसरातील बौद्ध बांधव/भगिनी यांना विनंती करण्यात येते की, या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन महाविहार परिवाराचे यशवंत गच्चे, साहेबराव पुंडगे, हिरामण वाघमारे, ईश्वर सावंत, बी.जी. पवार, शिद्धोधन जोंधळे, उत्तम सोनकांबळे, राजेश बिराडे, साहेबराव गायकवाड, रमेश कोकरे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment