संभाजी नगर :
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात होणारा 'इंद्रधनुष्य' राज्य आंतर विद्यापीठ युवक महोत्सव पुढे ढकलण्यात आला आहे. महोत्सव पुढे ढकलण्याची मागणी कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांना केली होती. त्यांची संमती आल्यानंतर आता इंद्रधनुष्य महोत्सव पुढे ढकलण्यात आला आहे.
येत्या ५ ते ९ नोव्हेंबर या सोहळ्याच्या नियोजित तारखा होत्या. या महोत्सवासाठी २३ विद्यापीठांच्या संघांनी ३१ ऑक्टोबरपर्यंत नावनोंदणी केली तर १ हजार २० कलावंत सोहळ्यात सहभाग नोंदविला आहे. एकूण २९ कलाप्रकारात या महोत्सवाचे नियोजन करण्यात आले.
काही विद्यापीठांनी देखील महोत्सवास सहभागी होण्याबद्दल अडचणी कळविल्या होत्या. अनेकांनी महोत्सव पुढे ढकलावा अशी मागणी देखील मा.कुलगुरु यांच्याकडे केली होती. त्यामुळे सर्वच बाबी लक्षात घेऊन सदर इंद्रधनुष्य महोत्सव पुढे ढकलण्यात आला असून नवीन तारीख दिवाळीनंतर जाहीर होण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment