जीवनदीप मध्ये पदवी प्रदान समारंभ संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 18 March 2024

जीवनदीप मध्ये पदवी प्रदान समारंभ संपन्न

गोवेली( प्रतिनिधी): जीवनदीप शैक्षणिक संस्था पोई संचलित कला ,वाणिज्य,विज्ञान महाविद्यालय गोवेली येथे आज दिनांक 17 मार्च 2024 रोजी पदवी प्रदान समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमासाठी पुढारी न्युज च्या सुप्रसिद्ध निवेदिका नम्रता वागळे अधिसभा सदस्य मुंबई विद्यापीठ डॉ.माधवी निकम ,उद्योजक तथा समाजसेवक माननीय सतीश कुलकर्णी ,जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष  श्री रविंद्र घोडविंदे ,संचालक प्रशांत घोडविंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलने व उपस्थित मान्यवरांच्या सत्काराने झाली. या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सुप्रसिद्ध निवेदिका नम्रता वागळे यांनी त्यांच्या मनोगताने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, तुम्ही ग्रामीण भागातील  आहात म्हणून तुम्ही कमीपणा बाळगू नका ,खूप शिका आणि पुढे जा. तसेच डॉ. माधवी निकम यांनी सुद्धा त्यांच्या मनोगतातून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहित करत मार्गदर्शन केले .त्यानंतर विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली आणि विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले यावेळ एकूण ३६३ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.  कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्य डॉ. के बी कोरे सूत्रसंचालन तर प्रा. दिनेश धनगर यांनी केले.कार्यक्रमास   उपप्राचार्य हरेंद्र सोश्टे,प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांची विशेष उपस्थिती व सहकार्य लाभले तसेच विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत हा कार्यक्रम संपन्न झाला.No comments:

Post a Comment

Pages