भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त 'रन फॉर ईक्वालिटी' स्पर्धेचे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 7 April 2024

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त 'रन फॉर ईक्वालिटी' स्पर्धेचे आयोजन

औरंगाबाद :

शहरातील डॉ. आंबेडकर मेडिकोज असोसिएशन (DAMA) ऑल इंडिया डॉक्टर्स फॉर ईक्वॉलिटी अँड एजिटेशन (AIDEA), MSEB इंजिनियर्स असोसीएशन, पी.ई.एस. परिवर्तन ग्रुप अश्या अनेक सामाजिक सगठनांच्या संयुक्त विद्यमाने मागील ५ वर्षांपासून 'रन फॉर इक्वालिटी' मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन शहरात करण्यात येते. यावर्षीही दिनांक १४ एप्रिल २०२४ रोजी ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 


नागसेनवनातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानापासून सकाळी ५:५० ला ही स्पर्धा सुरु होईल. ५ किमी (१६ वर्षाखाली मुले व मुली, १६ वर्षावरील महिला व पुरुष ), १० किमी. (१६ वर्षावरील महिला व पुरुष) असे वयोगट व २ अंतरांचा समावेश आहे. 


या स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी www.runforequality.org या संकेत स्थळावर १० एप्रिलपर्यंत नाव नोंदणी करता येईल. मॅरेथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी कसलेही नोंदणी शुल्क आकारण्यात येणार नसून, नोंदणी शुल्क च्या ऐवजी गरजवंत, होतकरू विद्यार्थ्यांना मदत म्हणून १ वही व १ पेन दान करण्याचे आवाहन मॅरेथॉन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. 

महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत, पोलीस उपायुक्त नितीन बगाटे, स्मार्ट सिटीचे उपकार्यकारी अधिकारी रविंद्र  जोगदंड ,शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, उपजिल्हाधिकारी डॉ. सुचिता शिंदे, साई चे सहसंचालक सुमेध तरोडेकर यांच्या हस्ते झेंडा दाखवून स्पर्धेचे उ‌द्घाटन होईल. 


डॉ. राहुल जावळे, प्राचार्य टी. ए. कदम, डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. भास्कर खैरे, इंजि. भुजंग खंदारे या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना ५०,००० रुपयांपर्यंतची रोख बक्षिसे, ट्रॉफी व सर्टिफिकेट देण्यात येणार आहेत तर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना मेडल्स, एनर्जी ड्रिंक्स व अल्पोपहार देण्यात येणार आहे. 


समाजात दिवसेंदिवस पसरत चाललेल्या विषमतेच्या वातावरणामध्ये समतेचा विचार रुजविण्याचा संदेश या मॅरेथॉन च्या माध्यमातून देण्यात येणार आहे. 


समाजातील प्रस्थापित जातीभेदाची मानसिकता व सामाजिक अन्यायाला आळा घालण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे अशा संदर्भाची नोंद 'एनहिलेशन ऑफ कास्ट' या साहित्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे. हे प्रेरणास्त्रोत मानूनच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे हे सहावे वर्ष आहे. आपल्या शारीरिक आरोग्यासोबतच सामाजिक आरोग्य टिकविण्यासाठी जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन रन फॉर ईक्वालिटी टीमच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Pages