किनवट : ब.पा. कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय किनवट येथे प्राचार्य एस.के.बेंबरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘करिअर कट्टा’ विभागाच्यावतीने सोमवारी ‘करिअर संसद पदाधिकारी शपथविधी सोहळा’ पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.पंजाब शेरे तर प्रमुख पाहुणे म्हणून कार्यवाहक प्रा.अनिल पाटील यांची उपस्थिती होती. या वेळी समन्वयक डॉ.आनंद भालेराव यांनी प्रस्तावना केली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.संतोष पवार यांनी केले.
या प्रसंगी करिअर संसदेतील मुख्यमंत्री म्हणून अनुसया पवार, नियोजन मंत्री म्हणून वेदिका जयस्वाल, कायदे व शिस्तपालन मंत्री कृतिका बारापात्रे, सामान्य प्रशासन मंत्री मेघा भारत आर. के. , माहिती प्रसारण मंत्री श्रेया जाधव, उद्योजकता विकास मंत्री जयश्री काळे, रोजगार स्वयंरोजगार मंत्री योगिता चव्हाण, कौशल्य विकास मंत्री साक्षी घंटलवार ,संसदीय कामकाज मंत्री गजानन मोदी, सदस्य म्हणून नितीन बेले यांनी आपापल्या पद व कर्तव्याबाबत शपथ घेतली.
या सोबतच महाविद्यालयातील पर्यावरण संरक्षण, स्वच्छता, परिसर स्वच्छता, विद्यार्थ्यांच्या समस्यांची सोडवणूक अशा विविध कामांसह महाविद्यालयाच्या विकासाकरिता सातत्याने प्रयत्नरत राहण्याची शपथ घेण्यात आली. सरते शेवटी उपस्थित विद्यार्थ्यांना अल्पोपाहार देण्यात आला. या कार्यक्रमास बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment