किनवट तालुक्यात बुधवारी सरासरी 16.46 मि.मी. पाऊस - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday, 25 July 2024

किनवट तालुक्यात बुधवारी सरासरी 16.46 मि.मी. पाऊस

किनवट  : तालुक्यात बुधवारी (दि.24) सकाळी संपलेल्या गत 24 तासांत एकूण नऊ मंडळात सरासरी 16.46 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात आजपर्यंत एकुण 480.10 मिलीमीटर पाऊस झाला असून, त्याची टक्केवारी 46.77 आहे.


      किनवट तालुक्यातील बुधवारी सकाळी नोंदलेला मंडळनिहाय  पाऊस पुढीलप्रमाणे असून, कंसात यंदाच्या एकूण पावसाची नोंद दिलेली आहे. किनवट- 17.0 (516.5 मि.मी.); बोधडी- 19.0(360.9 मि.मी.); इस्लापूर- 12.5 (454.9 मि.मी.); जलधरा- 17.3(670.6 मि.मी.); शिवणी- 15.8(440.7 मि.मी.); मांडवी- 16.5(488.2 मि.मी.);  दहेली- 13.5 (409.6 मि.मी.), सिंदगी मो. 16.8 (528.8 मि.मी.); उमरी बाजार 19.8 (447.6 मि.मी.).

No comments:

Post a Comment

Pages