डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे या संस्थेतून वादग्रस्त व जातीवादी महासंचालक सुनील वारे व निबंधक इंदिरा अस्वार यांची तात्काळ हाकालपट्टी करा : विद्यार्थी नेत्यांची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 26 July 2024

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे या संस्थेतून वादग्रस्त व जातीवादी महासंचालक सुनील वारे व निबंधक इंदिरा अस्वार यांची तात्काळ हाकालपट्टी करा : विद्यार्थी नेत्यांची मागणी

छत्रपती संभाजीनगर  :-

   डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे या संस्थेच्या महासंचालक पदी सुनील वारे यांची नियुक्ती झाल्यापासून सतत संशोधक विद्यार्थी हिताच्या विरुध्द त्यांनी निर्णय घेतले आहेत जसे की, कार्यालयासमोर सतत संशोधक विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असतात. २०१८, २०१९-२०, २०२१, २०२२ च्या विद्यार्थ्यांचे फेलोशिपचे प्रश्न प्रलंबित आहेत, सदर बाबत निरीक्षण केल्यास सुनील वारे हे अकार्यक्षम अधिकारी आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या आड असल्याचे प्रामुख्याने लक्षात येईल.


   डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन झाल्यापासून संस्था कायम वादात राहिलेली आहे. स्वायत्त संस्था असून ही त्यांना कुठेले ही निर्णय घेता येत नाही. सारथी, महाज्योती, टार्टी, आर्टी या सर्व संस्थांच्या स्थापना बार्टीच्या धर्तीवर स्थापन होऊन सुद्धा त्यांना पुरेशा प्रमाणात निधी दिला जातो व बार्टी स्थापने पासून ते आज पर्यंत अनुसूचित जातीच्या विशेषतः बौद्धांचा कुठल्याही प्रकारचा आर्थिक किंवा सामाजिक विकास ही संस्था करू शकली नाही. त्याचे एकमेव कारण म्हणजे बार्टीमध्ये चाललेले जातीचे राजकारण आज पर्यंत आलेल्या प्रत्येक महासंचालकाने जातीचेच राजकारण या ठिकाणीकेलेले आहे बौद्धांना कुठल्याच प्रकारचा लाभ मिळू नये अशा प्रकारचे महासंचालकाचे वर्तन असते. त्यातल्या त्यात या ठिकाणी बौद्ध समाजाविषयी प्रचंड चीड असलेल्या निबंधक इंदिरा अस्वार ह्या खलनायकाच्या भूमिकेत आहेत. बौद्ध समाजाच्या विकासाच्या आड त्या कायम येत असतात. त्यांचे मंत्रालयीन संबंध चांगले असल्याने त्यांनी बार्टीचे वाटोळे करायचे ठरवलेले आहे. त्या निबंधकाच्या भूमिकेत कमी आणि महासंचालकांच्या भूमिकेतच जास्त दिसत असतात, काही ठेकेदारांना मोठे करण्यातच त्यांचा रस दिसत आहे. विशेष म्हणजे सर्वच नियामक मंडळाच्या बैठका इंदिरा अस्वार यांना विचारून लावल्या जातात. या सर्वच बैठकीत विद्यार्थी विरोधी सर्व निर्णय घेण्यात आले आहे. असे अनेक प्रकार इंदिरा अस्वार व सुनील वारे हे वारंवार करत असतात.


   डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे या संस्थेच्या निबंधक श्रीमती इंदिरा अस्वार, यांच्या भ्रष्ट व अनितीपूर्ण कारभारामुळे बार्टी संस्था मलिन होत असून अनुसूचित जाती समूहाचे प्रचंड नुकसान होत आहे. जसे की, भीमा कोरेगाव नियोजनात गडबड करणे, संस्थेमध्ये अब क ड वर्गीकरण हा चुकीचा अहवाल सादर करणे. बेंच मार्क सर्वे बंद पाडणे अशा अनेक तक्रारी त्यांच्याविरोधात आहेत, डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव असलेल्या संस्थेची बदनामी त्यांच्यामुळे होत आहे त्यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र रोष आहे. त्याकरिता श्रीमती इंदिरा अस्वार व महासंचालक सुनील वारे यांची तात्काळ हाकालपट्टी करून बार्टीच्या महासंचालक पदी आय. आर.एस. (IRS) ऐवजी आय.ए.एस. (IAS) दर्जाच्या सक्षम बौद्ध अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी आणि निबंधक पदी सक्षम बौद्ध अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी.


   वरील मागण्याच्या तात्काळ सकारात्मक विचार करून मागण्या मंजूर करण्यात याव्या अन्यथा येत्या आठ दिवसात बौद्ध समाजाच्या वतीने आपल्या विरोधात राज्यभर तीव्र स्वरूपाचे जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्र्याना निवेदनामार्फत रिपब्लिकन विद्यार्थी सेना आणि पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडी वतीने देण्यात आलेला आहे. निवेदनावर सचिन निकम, गुणरत्न सोनवणे, अ‍ॅड.अतुल कांबळे, अमरदिप हिवराळे व निलेश वाघमारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments:

Post a Comment

Pages