किनवट : शासकीय स्वस्त धान्य योजनेच्या लाभार्थीचे ई-केवायसी करण्याचे निर्देश आहेत. परंतु सर्व्हर डाउन असल्याने ई-केवायसी करताना अडचणी आल्या आहेत.
३० सप्टेंबरअखेरपर्यंत ई-केवायसी रेशन लाभार्थीना करावयाची होती. पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारकांना रेशन दिले जाते. पिवळे रेशनकार्डधारकांसह केशरी शिधापत्रिकाधारकांना हे केवायसी करून घ्यायचे होते. परंतु याबाबत कुठेही गतीने काम रेशन दुकानदार करीत नसल्याची स्थिती होती.
यामुळे लाभार्थी संभ्रमात आहेत. कारण अनेकांची ई-केवायसी सर्व्हर डाउनच्या समस्येने झालेली नाही. यात रेशन दुकान सकाळी सुरू तर दुपारी बंद असते. काही दुकाने फक्त धान्य वाटपासाठी सुरू असतात. यामुळे लाभार्थीना रोज या रेशन दुकानात चकरा माराव्या लागत होत्या. ही ई-केवायसी सीएससी केंद्र किंवा बँकेत होत नसल्याने अधिकची अडचण झाली होती. ही केवायसी करताना लाभार्थीच्या बोटांचे ठसे
हवे असतात. यामुळे संबंधित लाभार्थीना रेशन दुकानात जावे लागत होते. परंतु सर्व्हर डाउनमुळे हे काम ठप्प झाले होते. यात लाभार्थीचा वेळ व खर्च वाया जात होता. कारण अनेक जण गावाबाहेर खासगी नोकरी, कामानिमित्त स्थलांतरित झालेले आहेत. यातील अनेकांची केवायसी तांत्रिक व अन्य अडचणींमुळे पूर्ण झालेली नाही. यामुळे या कामास मुदतवाढ देण्याचीही तयारी पुढे शासनाने ठेवावी, अशी मागणीदेखील केली जात आहे.
No comments:
Post a Comment