अशोकन स्क्रिफ्ट इन्स्टिट्यूटची कार्यकारिणी जाहीर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 7 July 2024

अशोकन स्क्रिफ्ट इन्स्टिट्यूटची कार्यकारिणी जाहीर


नाशिक -  दान पारमिता फाऊंडेशन अंतर्गत असलेल्या अशोकन स्क्रिफ्ट इन्स्टिट्यूटची नवनिर्वाचित कार्यकारिणी निवड सर्वानुमते करण्यात आली .

या संस्थेच्या  वतीने २० ऑगस्ट  रोजी सर जेम्स प्रिन्सेप यांच्या जयंती दिनी  विश्व धम्मलिपि गौरव दिन  साजरा केला जाणार आहे.   विश्व धम्मलिपि गौरव दिवस  गेल्या २ वर्षापासुन साजरा होत आहे. या वर्षी दादर , मुंबई येथे  साजरा होणार आहे. त्या बाबत पुर्वतयारी साठीची बैठक आज  दिनांक - 6  जुलै शनिवार  रोजी  हॉटेल द मॅरीओन,पाथर्डी फाटा ,नाशिक येथे सर्व सक्रिय सभासदांच्या उपस्थित संपन्न झाली.


प्रथम  सत्रात . सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष सुनिल खरे  यांनी बैठक बोलावण्याचा हेतु सर्वांना सविस्तर सांगितला. संस्था स्थापन करण्याचा हेतु आणि संस्था नोंदणीकृत केल्याने कशा प्रकारे कामाला योग्य गती मिळते आणि चांगले आणि योग्य पद्धतीने काम केले तर सर्वापर्यंत धम्मलिपी आणि सर जेम्स  प्रिन्सेप आणि महान चक्रवर्ती सम्राट अशोक यांचे कार्य पोहचेल असे सांगितले. 

तसेच  नाशिक आणि नागपुर येथे झालेल्या विश्व धम्मलिपी गौरव दिनाचे अनुभव सांगितले.

संतोष अंभोरे  यांनी  सर जेम्स  प्रिन्सेप आणि सम्राट अशोक यांचे कार्य किती महान आहे आणि आपण त्यांच्या प्रति कृतज्ञ राहुन त्यांच्या महान कार्याप्रति सजग राहुन त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे चालवला पाहिजे असे नमुद केले. 

प्रविण जाधव यांनी कार्यक्रमाचे महत्व सांगितले आणि आपली दान पारमिता  फाउंडेशन संस्था एक परीवार आहे आणि आपण सर्व जण एकत्र मिळून सोबत काम करुया,आणि संस्था कशी वाढेल आणि धम्मलिपीचा प्रचार आणि प्रसार  करण्यासाठी आपण सर्वांनीच कटिबद्ध राहुया. आणि बौध्द  संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करूया असे यावेळी सांगितले. 


सदर बैठकीत कार्यक्रम  कसा साजरा करायचा आणि त्यासाठी करावे लागणारे नियोजन आणि इतर संस्थेच्या कामाचा आढावा घेण्यात आला. तसेच उपस्थित सर्व सभासदांनी आपले विचार मांडले.  

तसेच  दुसऱ्या सत्रात दान पारमिता फाउंडेशन या संस्थेच्या अंतर्गत अशोकन स्क्रिप्ट इन्स्टिट्यूट या समितीची कार्यकारिणी  सर्वांनुमते निवड करण्यात आली.

अध्यक्ष रुपाली गायकवाड, कार्याध्यक्ष अर्चना वाघमारे, सचिव आकाश हजारे, खजिनदार मिलिंद भालेराव, संघटक युवराज वाघ, राजेंद्र पगारे, ज्ञानेश्वर सोनवणे, सदस्य म्हणून दिलीप वासनिक, संतोष जाधव, शांता मुलगे, वंदना बनसोडे तर समितीचे सल्लागार म्हणून मिलिंद तेलुरे यांची निवड करण्यात आली, 

तसेच संस्थेच्या अंतर्गत  प्रत्येक जिल्ह्यात विभागप्रमुख म्हणून निवड करण्यात आली,  छत्रपती संभाजी नगर - वंदना बनसोडे, सचिन म्हस्के, नवी मुंबई- अर्चना वाघमारे, शांता मुलगे, मुंबई उपनगर - शिल्पा जाधव,  मुंबई- आकाश हजारे, ज्ञानेश्वर सोनवणे, रुपाली गायकवाड, ठाणे - संतोष जाधव, जळगाव- मिलिंद भालेराव, जयपाल पगारे, रायगड- युवराज वाघ, रत्नागिरी- दिलीप वासनिक, नागपूर- अलका गवई, निर्झरा रामटेके, प्रगती मेश्राम, नाशिक - प्रवीण जाधव, संतोष आंभोरे, सुनील खरे यांची निवड करण्यात आली. सदर बैठकी प्रसंगी , नाशिक , मुंबई , औरंगाबाद , शहापुर , रत्नागिरी , चाळीसगाव , जळगाव , इत्यादी शहरातुन लेणी अभ्यासक  हजर होते. अत्यंत शिस्तबद्ध आणि खेळीमेळीच्या वातावरणात सदर बैठक संपन्न झाली. आभार रूपाली गायकवाड  यांनी  मानले.

No comments:

Post a Comment

Pages