प्रवेश अर्जासोबत परीक्षा आवेदन व परीक्षा शुल्क भरण्याबाबतचा निर्णय तात्काळ रद्द करा ; रिपब्लिकन विद्यार्थी सेनेची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 26 July 2024

प्रवेश अर्जासोबत परीक्षा आवेदन व परीक्षा शुल्क भरण्याबाबतचा निर्णय तात्काळ रद्द करा ; रिपब्लिकन विद्यार्थी सेनेची मागणी


 छ. संभाजीनगर दि.२६ शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासुन सर्व पदवी, पदविका व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे परीक्षा आवेदन पत्र व परीक्षा शुल्क हे प्रवेश अर्जासोबत घेण्याबाबतचा निर्णय तात्काळ रद्द करावा अशी मागणी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आली असून प्र. कुलगुरु डॉ.सरवदे यांनी निवेदन स्वीकारले.


         याबाबत शिष्टमंडळासोबत चर्चा करताना हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक नसून ऐच्छिक आहे परिक्षेपासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले परंतु या मुळे 75% उपस्थितीचा नियम मोडला जाऊ शकतो अशी शंका व्यक्त केली असता त्या दृष्टीने विचार करू असे त्यांनी आश्वस्त केले.


हा निर्णय ऐच्छिक असल्याने आर्थिक स्थिती नसणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फटका बसू नये याची खबरदारी घेण्याचे त्यांनी सांगितले परंतु याबाबत स्वतंत्र परिपत्रक काढून हा संभ्रम दूर करावा, आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना संस्थाचालकानी अडवून धरू नये यासाठी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा अशी मागणी केली आहे.


विद्यापीठाने निर्णय घेताना त्याबाबत स्पष्ट भूमिका ठेऊन संभ्रम निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे असे गोंधळात टाकणारे निर्णयामुळे विद्यापीठ प्रशासनाच्या भूमिकेवर संशय निर्माण होतो विद्यापीठाकडून यात स्पष्टता नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

       यावेळी सचिन निकम, गुणरत्न सोनवणे, अतुल कांबळे यांनी निवेदन सादर केले.

No comments:

Post a Comment

Pages