इलाही जमादार गझल दालन भेटीत विद्यापीठ परीक्षा नियंत्रक डॉ. नेटके भारावले - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 23 July 2024

इलाही जमादार गझल दालन भेटीत विद्यापीठ परीक्षा नियंत्रक डॉ. नेटके भारावले


 नांदेड, (प्रतिनिधी)- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी श्री गुरु गोविंदसिंघजी पत्रकारिता महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या गझलकार इलाही जमादार दालनास भेट दिली. दालनात असलेल्या सुप्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांच्या विविध गझलसंग्रहांची त्यांनी  आस्थेवाईक पणे पाहणी केली. इलाही जमादार यांच्या गझलसंग्रहांचा साठा या महाविद्यालयात  सुरक्षित जतन करण्यात येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. इलाही जमादार यांना मिळालेले विविध पुरस्कार त्याचबरोबर त्यांची हस्तलिखिते यावेळी डॉ. दिगंबर नेटके यांनी चाळली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास कदम यांनी यावेळी डॉ. दिगंबर नेटके यांना इलाही जमादार यांच्या गझलसंग्रहांची भेट दिली. इलाही जमादार यांच्या  आठवणींना यावेळी प्राचार्य डॉ. विकास कदम यांनी उजाळा दिला. 'फुलपाखरू' या गजलसंग्रहातील पर्यावरणावर भाष्य करणाऱ्या 'तुझी प्रतीक्षा करून पावसा सुकू लागली झाडे, गळू लागली पाने अवघी रडू लागली झाडे' या  रचनेचे त्यांनी कौतुक केले. वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार, विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे प्रा. डॉ. साहेबराव शिंदे यांचीही यावेळी उपस्थिती होती. तसेच कॉलेजचे व्यवस्थापकीय विलास वाकीकर प्रा.अमोल धुळे प्रा. विपिन कदम  प्रा. संजय नरवाडे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages