संयुक्त राष्ट्र संघाचा मानव विकास कार्यक्रमांतर्गत 30 गरोदर मातांनी स्त्री रोगतज्ञ डॉक्टरांकडून प्रसूति पूर्व संपूर्ण आरोग्य तपासणी शिबीर संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday, 24 July 2024

संयुक्त राष्ट्र संघाचा मानव विकास कार्यक्रमांतर्गत 30 गरोदर मातांनी स्त्री रोगतज्ञ डॉक्टरांकडून प्रसूति पूर्व संपूर्ण आरोग्य तपासणी शिबीर संपन्न


किनवट प्रतिनिधी: तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, किनवट यांच्यावतीने संयुक्त राष्ट्र संघाचा मानव विकास कार्यक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, राजगड येथे आज 30 गरोदर मातांनी आदिवासी भागात उच्च शिक्षीत व अनुभवी स्त्री रोग तज्ञ असलेल्या साने गुरुजी रुग्णालयाच्या स्त्रीरोग तज्ञ डॉ. भाग्यश्री MBBS DGO यांच्याकडून प्रसूतिपूर्व आरोग्य शिबीरात योग्य मार्गदर्शन आणि संपूर्ण तपासणी कार्यक्रमाचा लाभ घेतला.


 अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिराणी मॅडम, किनवटचे तालुका आरोग्य आधिकारी डॉ. के. पी. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र, राजगड येथे आज संयुक्त राष्ट्र संघाचा मानव विकास कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील मातांचे आरोग्य चांगले रहावे, निकोप बालके जन्माला यावित, लोकांच्या आरोग्याची निगा राखावी या हेतूने प्रसूति पूर्व आरोग्य तपासणी पहिल्या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार या शिबीरात डॉ. भाग्यश्रीताईनी उपस्थित शिबीरातील गरोदर मातांची संपूर्ण आरोग्य तपासणी, उपचार आणि त्यांचे पालक यांना सोप्या समजेल अशा शब्दात गरोदरपण काळात योग्य आहार, विहार आणि पुरेशी विश्रांती घ्यावी व आपण व आपले नातेवाईक गरोदरपणात पुढील उपचारासाठी जिल्हा उपरुग्णालय, गोकुंदा येथील स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांकडूनच उपचार व मार्गदर्शन घ्यावे असा सल्ला या प्रसंगी दिला. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने या मातांना आवश्यक पुरेशा गोळया, औषधी आणि योग्य सल्ला दिला.


 राजगड सारख्या छोटया गावात प्राथमिक व प्राथमिक आरोग्य केंद्रात चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्‍ध्‍ होत असल्यामुळे गरोदर माता व त्यांचे नातेवाईक यांनी समाधान व्यक्त केले व पूढेही अशाच आरोग्य सेवा मिळावे ही अपेक्षा व्यक्त केली.


वैद्यकिय अधिकारी डॉ. व्यकंटेश आईटवार यांनी या शिबीराचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. के. पी. गायकवाड तालुका आरोग्य अधिकारी व स्त्री रोग तज्ञ डॉ. भाग्यश्री बेलखोडे – वरटकर, अंगणवाडी सेविका, अशावर्कर, उपस्थित गरोदर माता व त्यांचे नातेवाईक यांचे आभार मानले. सदरील शिबीर यशस्वी करण्यासाठी आरोग्य परीवेक्षीका श्रीमती मंगरपवाड व सर्व महिला, आरोग्य केंद्र कर्मचारी, आशा व आंगणवाडी सेविका ईत्यादीनी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment

Pages