किनवट :
महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गोकुंदा,किनवट येथे दिनांक 01 ऑगस्ट 2024 रोजी निवडणूक विभाग भारत सरकार तर्फे "नवमतदार नोंदणी कार्यक्रम" आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी या कार्यक्रमासाठी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून किनवट तहसीलच्या तहसीलदार मा.शारदा चौडेकर मॅडम, किनवट तहसीलचे नायब तहसीलदार मा. व्ही.पी. राठोड साहेब, किनवट तहसीलचे तांत्रिक सहाय्यक मनोज कांबळे, विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य अंबादास जुनगरे, उपप्राचार्य राधेश्याम जाधव, पर्यवेक्षक आर. व्ही. इंगळे आधी मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस 01 ऑगस्ट या दिवशी साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांचा स्मृतिदिन निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार दीप धूप अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.
तदनंतर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या तहसीलदार मा. शारदा चौडेकर मॅडम, तहसील किनवट यांचं स्वागत विद्यालयाच्या शिक्षिका कुलकर्णी मॅडम यांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन केले, नायब तहसीलदार व्हि.पी. राठोड, तहसील किनवट यांचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य अंबादास जुनगरे यांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन केले. मनोज कांबळे तांत्रिक सहाय्यक किनवट तहसील यांचे स्वागत उपप्राचार्य राधेश्याम जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन केले, प्राचार्य अंबादास जुनगरे यांचे स्वागत प्रा.डॉ.एच एल सोनकांबळे यांनी केले.
यावेळी आपल्या भाषणातून मा.शारदा चौडेकर मॅडम यांनी 18 ते 19 वर्ष पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी नवमतदार म्हणून आपले नाव नोंदवणे का गरजेचे आहे याबद्दल विस्तृत असं मार्गदर्शन केलं व यानंतर व्ही.पी राठोड सर यांनी मतदान नोंदणी मध्ये नवमतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी फॉर्म नंबर 6 याविषयी सविस्तर अशी माहिती विद्यार्थ्यांना दिली. नवमतदार म्हणून प्रत्येकाची नोंद होणे का गरजेचे आहे आणि ते कशा पद्धतीने केली पाहिजे याबद्दलची माहिती त्यांनी आपल्या भाषणामधून दिली.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील इयत्ता बारावीतील बहुसंख्य विद्यार्थिनी-विद्यार्थी, प्राध्यापक,शिक्षक,शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुबोध सर्पे तर आभार प्रा.डॉ.हेमंत सोनकांबळे यांनी मानले.
No comments:
Post a Comment